State Government Announcement : राज्य सरकारची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Dearness Allowance Order : जाणून घ्या, आता किती टक्के झाला आहे. महागाई दर आणि नेमका काय आहे शासन आदेश?
Dearness Allowance
Dearness AllowanceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य सरकारने शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार गुरुवारी सरकारने आदेश काढला आहे.

शासनाकडून जारी झालेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, '' १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ टक्केवरून ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधतील थकबाकीसह नोव्हेंबर २०२३च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर , ''महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे. त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्या खालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.''

Dearness Allowance
Delhi High Court : घटस्फोटानंतर पत्नीने क्षमता असेल तर कमवावे; हाय कोर्टाने स्पष्टच सांगितले

तसेच ''अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्याबाबत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा,'' असेही सांगण्यात आले आहे.

याशिवाय हा सरकारचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२३११२३१६३३१६१७०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकितकरून काढण्यात येत आहे,'' असे पत्रक राज्यपालांच्या आदेशानुसार काढण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com