7000 million Indian notes : भारताकडून पहिल्यांदाच विक्रमी सात हजार मिलियन नोटांची छपाई; दहा रुपयांच्या नोटा न छापण्याचं काय आहे कारण?

India Prints 7000 Million Currency Notes at Nashik Press Government Update 2025 : भारताने पहिल्यादांच भारतीय नोटांची विक्रमी छपाई केली आहे.
7000 million Indian notes
7000 million Indian notesSarkarnama
Published on
Updated on

Nashik Currency Note Press : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये पहिल्यांदाच 2024-25 मध्ये विक्रमी सात हजार मिलियन म्हणजेच 700 कोटी नोटांची छपाई करण्यात आली आहे.

यापूर्वी 2023-24 मध्ये 530 कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. नोट बंदीच्या काळातही 600 कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. सध्या दहा रुपयांच्या नोटांव्यतिरीक्त सर्व नोटा छापल्या गेल्या आहेत.

भारतीय (India) नोटा छपाईचे मोठे निकष आहेत. यात प्रामुख्याने महागाईचा दर आणि आर्थिक वाढ पहिली जाते. त्याशिवाय डिजिटल करन्सीचे प्रमाण, रोख रकमेची मागणी व गरज, चलनातून बाद झालेल्या नोटा, बाजाराची स्थिती, खराब नोटा या बाबींचा आढावा घेऊन नोटा छापल्या जातात.

7000 million Indian notes
Mahayuti cabinet meeting Chondi : चौंडीत मंत्र्यांचा थाट, जेवायला चार हजारांचं कास्य धातूचं ताट

आयएसपी इंडिया सिक्युरिटी प्रेसमधून आयएसपी व सीएनपी करन्सी नोट प्रेस हे दोन प्रेस स्वतंत्र येथे आहेत. या व्यतिरिक्त भारतात देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर कर्नाटक (Karnataka) सालबोनी (पश्चिम बंगाल) येथे नोटांची छपाई केली जाते. ‘आयएसपी’मधील छपाईत पासपोर्ट, मिलिटरी वॉरंट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, भारतीय रिझर्व्ह बँकेचे धनादेश यांची छपाई केली जाते. ‘सीएनपी’मध्ये फक्त चलनी नोटा छापल्या जातात.

7000 million Indian notes
Top 10 News : ऑपरेशन सिंदूरची ‘A to Z’ कहाणी, मोदीजींच्या लेकींचं कुंकू तुम्ही पुसलं, चौंडीत मंत्र्यांचा थाट: वाचा महत्वाच्या घडामोडी

नोट प्रेसची स्थापना 1928 मध्ये झाली. त्यानंतर 1962 मध्ये ‘आयएसपी’ व ‘सीएनपी’ हे दोन प्रेस स्वतंत्र करण्यात आले. 2006 मध्ये व्यावसायिकरणाच्या दरम्यान उत्पादन सुविधा ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’, असा एक विभाग बनवण्यात आला.

नोटबंदीनंतर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीची घोषणा केली होती. या नोटबंदीनंतर नोटांच्या छपाईत आधुनिकीकरण व उच्च तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला. यासाठी नवीन यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली. व्यवस्थापन व कामगार यांच्या योग्य समन्वयातून नोटांचे विक्रमी उत्पादन यशस्वी करण्यात आल्याची प्रतिक्रिया आयएसपी व सीएनपी प्रेस संघटनेचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com