Mahayuti cabinet meeting Chondi : चौंडीत मंत्र्यांचा थाट, जेवायला चार हजारांचं कास्य धातूचं ताट

Ram Shinde Serves Bronze Plate Meal to Mahayuti Cabinet in Chondi Ahilyanagar : अहिल्यानगरच्या चौंडी इथं महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झालेल्या मंत्र्यांना दिलेल्या कास्य धातूच्या ताटात दिलेलं जेवण चर्चेत आलं आहे.
Mahayuti cabinet meeting Chondi
Mahayuti cabinet meeting ChondiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra state cabinet event : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) इथं महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. ग्रामीण भागात अशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे ही बैठक राज्यात चर्चेचा विषय ठरली.

या बैठकीवरील खर्चाचा देखील मुद्दा टीकेचा ठरला होता. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या आग्रहास्तव ही बैठक चौंडीत झाली. या बैठकीत जेवणाच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी घेतली. त्यामुळे मंत्रिमंडळाला कोणतं जेवण घेणार, याची चर्चा सुरू झाली. आता जेवणासाठी मंत्र्यांना कास्य धातूच ताटं होत. या प्रति ताटाची किंमत सुमारे चार हजार रुपये होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

चौंडीत महायुती (Mahayuti) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना जेवणासाठी कास्य धातूची ताटे ठेवण्यात आली होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार या धातूच्या भांड्यामध्ये जेवण करणं हे आरोग्यासाठी फायद्याचं असते. मंत्र्यांसाठी कास्य धातूच्या प्रति ताटाची किंमत अंदाजे चार हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. पिण्याच्या पाण्याचा ग्लास ही कास्य धातूचा होता.

Mahayuti cabinet meeting Chondi
Operation Sindoor : पाकिस्तानची घाबरगुंडी; आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 48 तासांसाठी बंद, 'LOC'वर गोळीबार सुरूच

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या संवर्धन, जतनासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केलं. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्यासह सर्व मंत्री सहभागी झाले होते. या मंत्र्यांचं विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी काठी, धनगरी पगडी, घोंगडी, अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती व गौरवगाथा देऊन स्वागत केलं. मंत्र्यांचा हा सत्कार देखील जामखेडमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला. यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला होता.

Mahayuti cabinet meeting Chondi
Mahayuti Local Politics : अजितदादा गट वरचढ ठरलाय; निशीकांत पाटलांच्या चालींनी वाढलीय भाजपची डोकेदुखी...

या बैठकीसाठी शाही शामियाना उभारण्यात आला होता. जंगर हँगर मंडपाचा सभागृह होता. त्यात चार बाजूंनी पांढरे सोफे ठेवलेले होते. मध्यभागी घोंगड्या अंथरण्यात आलेल्या होत्या. या घोंगड्यांचे महत्त्व देखील बैठकीपूर्वी सांगितलं होतं. घोंगडीवर चप्पल किंवा बूट घालून जाता येत नसल्याचे सुरुवातीलाच प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बैठकीत घोंगड्या देखील चर्चेस्थानी आल्या.

या बैठकीनंतर शेजारीच भोजन कक्ष उभारण्यात आला होता. मुंबई येथील मिनी पंजाबी केटरिंग यांनी मंत्र्यांसाठी भोजन बनवले होते. भोजन कक्षात चौकोन आकारात टेबल ठेवून त्यावर पांढरे कापड टाकण्यात आले होते. त्यावर मंत्र्यांना जेवणासाठी कास्य धातूचे ताट, ग्लास आणि दोन वाट्या ठेवण्यात आलेल्या होत्या. या कक्षात सुमारे शंभर जणांच्या जेवणाची व्यवस्था होती.

जेवणात मसाला ताक, मटक्यातील लस्सी, मासवडी, कोथिंबीरवडी, खारे वांगे, वांग्याचे भरीत, हुलग्याची सुखी उसळ, कर्जतची प्रसिद्ध शिपी आमटी, हिरव्या मिरचीचा ठेचा, ज्वारीची भाकरी, बाजरी, चपाती, पुरणपोळी, आमरस असा बेत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com