Jogendra Katyare News : खेडचे प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे अखेर निलंबन..!

Jogendra Katyare accused Suhas Divse and Dilip Mohite : जोगेंद्र कट्यारे यांच्यावर लिहिलेल्या पत्रामुळे निवडणूक आणि प्रशासकीय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Dilip Mohite, Suhas Divse, Jogendra Katyare
Dilip Mohite, Suhas Divse, Jogendra KatyareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप करत थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. दिवसेंच्या बदलीची मागणी करत कट्यारेंनी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावरही आरोप केले होते. या प्रकरणी बडतर्फ असलेल्या कट्यारेंचे अखेर निलंबन करण्यात आले आहे.

कट्यारेंच्या 'लेटरबॉम्ब'मुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील प्रशासन आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांना उचलबांगडी करत बडतर्फ केले आहे. आता त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

जोगेंद्र कट्यारे Jogendra Katyare यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे निवडणूक आणि प्रशासकीय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कट्यारे यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आहे. या प्रकरणी कट्यारे यांची चौकशी होऊन त्यांना दोषी धरण्यात आले आहे. यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Dilip Mohite, Suhas Divse, Jogendra Katyare
Pune RTO : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल; 'हे' मार्ग बंद

काय आहे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीत पुण्याचे 'कलेक्टर' सुहास दिवसे Suhas Divse यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशा मजकुराचा लेटर थेट निवडणूक आयोगाला पाठवले होते. यामुळे दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

या पत्रात कट्यारे यांनी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील Dilip Mohite Patil यांच्यावरही आरोप केले होते. मोहिते पाटलांच्या सांगण्यावरून दिवसे मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी तक्रार केली होती. निवडणूक असतानाही पुणे रिंग रोडच्या कामात गुंतवून ठेवले. आता हे सर्व सहन होत नसल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे कट्यारेंनी पत्रात नमूद केले होते.

Dilip Mohite, Suhas Divse, Jogendra Katyare
Ajit Pawar Budget Speech : 'तुफानों में संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है!' अजितदादांचा शायराना अंदाज..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com