Pune RTO : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल; 'हे' मार्ग बंद

Sant Dnyaneshwar And Sant Tukaram Maharaj Palki : पालखी आगमनावेळी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने केले आहे.
Palkhi Sohala
Palkhi SohalaSarkarnama

Pune News : पुणे शहरात रविवारी (ता. 30) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होणार आहे. या पालखींचा शहरात दोन दिवस मुक्काम असणार आहे.

पालखी आगमनावेळी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्‍यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिंपरी चिंचवड येथून रविवारी दुपारी पुण्यात दाखल होईल. त्यामुळे बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता बंद असेल.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, येरवड्यातील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहील. या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहतील, तर अन्य रस्ते सुरू असणार आहेत.

Palkhi Sohala
Ajit Pawar Budget Speech : 'तुफानों में संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है!' अजितदादांचा शायराना अंदाज..

या दोन्ही पालख्या पाटील इस्टेट परिसरापासून एकाच मार्गावरून मुक्कामस्थळी पोचणार आहेत. त्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, वेधशाळा चौक, वीर चापेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गोखले स्मारक चौक (गुडलक), खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलिस चौकी येथून श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी अरुणा चौकमार्गे नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौकमार्गे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामास येईल. पालख्यांच्या मुक्कामानिमित्त नाना-भवानी पेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

Palkhi Sohala
Kunal Patil Politics : कुणाल पाटलांचा भाजपला दुसरा धक्का; धुळ्यात पॅनेलसाठी उमेदवारही मिळेनात!

वाहतुकीस बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग

  • गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स कॉर्नर चौक ते संचेती रुग्णालय)

पर्यायी मार्ग - रेंजहिल्स- खडकी पोलिस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता.

  • फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक)

पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक)

पर्यायी मार्ग - कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहागीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता

* टिळक चौक ते वीर चापेकर चौक

पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल

  • लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक),

पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता

  • शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी ते खंडोजीबाबा चौक रस्ता बंद

(Edited by Sunil Dhumal)

Palkhi Sohala
Eknath Shinde On Uddhav Thackeray : अडीच वर्षे त्यांनी 'लाडला बेटा योजना' राबवली; शिंदे यांची ठाकरेंवर सणसणीत टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com