Kalyan News : काय सांगता? पोलिसांनी औषधांची बाटली उघडताच निघाला गांजा !

Khadakpada Police arrested two People : याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी कैद्याला गांजा पुरविणाऱ्या या दोन मित्रांना बेड्या ठोकत अटक केली.
Khadakpada Police
Khadakpada Police Sarkarnama

Mumbai News : जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला मित्राला भेटण्यासाठी आलेल्या दोघांनी त्याला गांजा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला गांजा देण्याचा प्रयत्न फसला. औषधाच्या बाटलीतून हा गांजा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे कैद्यांना भेटण्यासाठी येणारी मंडळी त्यांच्यापर्यंत तंबाखू तसेच नशा करण्याच्या वस्तू पोहचविण्यासाठी काय युक्त्या लढवितात याची एक झलकच यानिमित्ताने उजेडात आली आहे.

कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये हा प्रकार उजेडात आला आहे. या जेलमध्ये एक कैदी शिक्षा भोगत आहे. हा कैदी मोक्क्यातील आरोपी आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचे दोन मित्र आले होते. कैदी मित्राला देण्यासाठी या दोघांनी औषधे आणली होती. जेलमध्ये जाण्यासाठीच्या गेटवर असलेल्या पोलिसांनी तपासणी करत औषधाची बाटली उघडली असता त्यामध्ये गांजा असल्याचे समोर आले. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी कैद्याला गांजा पुरविणाऱ्या या दोन मित्रांना बेड्या ठोकत अटक केली.

डोंबिवलीत राहणारे दोन तरुण गुरुवारी दुपारी आधारवाडी जेल (Jail) जवळ आले .जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तुरुंग पोलिस हवालदार रमेश सोमार्डे यांना या दोघांनी मित्राला औषधे द्यायची आहे.आमची सर्व प्रक्रिया झाली आहे, असे सांगितले. पोलिस हवालदार सोमार्डे यांनी औषधांनी भरलेली ही पिशवी ताब्यात घेतली. जेलमध्ये औषध देण्याच्या आधी या दोघांसमोरच त्यांनी पिशवी उघडली. तेव्हा पिशवीत काही औषधे होती. कायम चूर्णची बाटली होती. ही बाटली उघडताच त्या बाटलीत कायम चूर्ण ऐवजी चक्क गांजा भरलेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

Khadakpada Police
Model Code of Conduct : 'ही' क्षेत्र वगळता महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात!

आधारवाडी जेलचे प्रमुख यांनी तातडीने ही माहिती खडकपाडा पोलिसांना दिली. औषधांच्या नावाखाली जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या मोक्क्यातील आरोपी संकेत दळवी याला गांजा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.प्रेम बर्डे आणि अविनाश जाधव अशी त्यांची नावे असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या दोघांनी हा गांजा कुठून आणला. कोणाच्या सांगण्यावरुन मोक्काच्या आरोपीला गांजा पुरवित होते. याचा तपास खडकपाडा पोलिसांनी सुरु केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com