Model Code of Conduct : 'ही' क्षेत्र वगळता महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात!

Election Commission : राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे माहिती.
Election Commission of India
Election Commission of IndiaSarkarnama

Loksabha Elections 2024 Model Code of Conduct In Maharashtra: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. देशात पुन्हा एकदा एनडीए आघाडीचे सरकार सत्ता स्थापन करणार आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे. हे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

तर राज्यात महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीची सगळी धामधुम आता शांत झाली आहे. याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिताही संपुष्टात आली आहे.

दरम्यान लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

Election Commission of India
Vidhanparishd Election News : मुंबई, कोकण पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी पुन्हा निवडणूक जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान

राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Election Commission of India
MNS News : "हिंदुत्वाच्या विचारानं पदवीधर, विधानसभा आणि महापालिका निवडणूक लढणं सोडायचे का?" मनसे नेत्याचा सवाल

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर शिक्षक संघटनेच्या मागणीनंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

निवडणूक आयोगाने (Election Commission) या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार आता 26 जून रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी केली जाणार आहे. तर 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर उमेदवारी अर्जाची छाननी 10 जूनला होणार आहे. उमेदवारी 12 जूनपर्यंत मागे घेता येणार आहे.

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक (Teacher Election) या चार मतदारसंघांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या चार जागांसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी हॊणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com