Maharashtra Election Commissioner Update: 'स्थानिक'च्या निवडणुकांबाबत मोठे संकेत; राज्य निवडणूक आयुक्तपदी 'या' अधिकाऱ्याची घोषणा

Local Body Election : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी नवनिर्वाचित निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावर असणार आहे.
 Election
Election Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारकडून सत्तास्थापनेनंतर तब्बल दीड महिन्यानंतर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (Mahayuti Government) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे निवडणूक आयुक्तपदी ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी (ता.20) राज्यपालांनी (Governor) शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. राज्यापालांकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर राज्य सरकारनं वाघमारेंच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी नवनिर्वाचित निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावर असणार आहे. ते सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. वाघमारे यांची नियुक्ती ही पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.

 Election
Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन 'हा' आमदार महायुतीवरच भडकला; म्हणाला, 'आमचा राजकीय अंत झाला तरी...'

आगामी काळात होत असलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यापासून ते मतदारयाद्यांची निर्मिती,यांसारखे अनेक जबाबदार्या त्यांच्यावर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com