Lok Sabha Election 2024 : अखेरच्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात तब्बल 904 उमेदवार

Election Commission : निवडणूक आयोगाकडून सातव्या टप्प्यांतील राज्यनिहाय उमेदवारांची माहिती प्रसिध्द केली आहे. या टप्प्यांत आठ राज्यांत 57 जागांसाठी मतदान होणार आहे.
Election Commission of India
Election Commission of IndiaSarkarnama

Election 2024 Updates : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) पाच टप्प्यांतील मतदान (Voting) प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. सहाव्या टप्प्यातील प्रचाराचा गुरूवारी (ता. 23) अखेरचा दिवस आहे. तर सातव्या टप्प्यांचे मतदान एक जूनला होणार आहे. या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार असून त्यासाठ 904 उमेदवार रिंगणात आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) सातव्या टप्प्यांतील उमेदवारांची माहिती देण्यात आली आहे. सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यांत 57 जागा असून त्यासाठी तब्बल 2 हजार 105 इच्छूकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अखेरच्या दिवसअखेर 904 अर्ज राहिले आहेत. (Lok Sabha election seventh phase voting)

Election Commission of India
Jayant Sinha News : जयंत सिन्हांनी भाजपलाच पाडलं तोंडावर; खरमरीत पत्रातून दिलं सडेतोड उत्तर

सातव्या टप्प्यात पंजाब (Punjab) आणि उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सर्वाधिक प्रत्येकी 13 जागांसाठी मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 9 आणि बिहारमध्ये (Bihar) आठ जागा आहे. त्यामुळे या टप्प्यांत ही चार राज्ये महत्वाची आहेत. सर्वाधिक उमेदवार पंजाबमध्ये आहेत. तेरा जागांसाठी 598 उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजेच एका मतदारसंघात तब्बल सरासरी ४६ उमेदवार आहेत. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेशातही 13 जागांसाठी 495 उमेदवार आहेत. बिहारमधील जहानाबाद मतदारसंघात सर्वाधिक तब्बल 73 उमेदवार आहेत. त्याखालोखाल पंजाबमधील लुधियानामध्ये 70 उमेदवार मैदानात आहेत. सर्व मतदारसंघांचा विचार केल्यास सातव्या टप्प्यांत प्रत्येक मतदारसंघात सरासरी 16 उमेदवार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

दरम्यान, सातव्या टप्प्यात पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9), ओडिशा (6), झारखंड (3), हिमाचल प्रदेश (4), चंदीगड (1) आणि बिहार (8) या राज्यांतील एकूण 57 मतदारसंघात मतदान होणार आहे. हा अखेरचा टप्पा असल्याने प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पंजाब आणि बंगालमधील मतदानाकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे.  

Election Commission of India
Arvind Kejariwal Statement: स्वाती मालीवाल मारहाण आरोप प्रकरणावर मुख्यमंत्री केजरीवाल पहिल्यांदाच बोलले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com