Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीचे 'कंट्रोल' सखींच्या हाती; मुंबईत 11 तर पालघरमध्ये 7 मतदान केंद्र

Election News : लोकसभेसाठी देशभरात सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून त्यासाठी मुंबईत 11 तर पालघरमध्ये 7 सखी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
election Duty
election Duty Sarkarnama

Mumbai News : लोकसभेसाठी देशभरात सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी, या दृष्टीकोनातून 'महिला नियंत्रित मतदान केंद्रे' स्थापन करण्यात आली आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मुंबई शहर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील 11 विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. त्याशिवाय उपनगरातील पालघर लोकसभा मतदारसंघात 7 केंद्र असणार आहेत. ( Lok Sabha Election News )

election Duty
Yogendra yadav News : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणार इतक्या जागा; योगेंद्र यादवांचा मोठा दावा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, महाराष्ट्रातील 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील काही मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे सोपवण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच महिला असणार आहेत.

या मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी महिलाच मतदान प्रक्रियेत महिलांचा रचनात्मक सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालवलेली मतदान केंद्र तयार करण्यावर भर दिला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण ११ सखी मतदान केंद्रे असणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या 11सखी मतदान केंद्रापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात 6 तर मुंबई दक्षिण मतदारसंघात 5 सखी मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असून धारावी मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मतदान केंद्र क्रमांक 100 आणि धारावी ट्रान्सलेट कॅम्प मनपा शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 82 ही धारावी मतदारसंघातील दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. त्याशिवाय पनगरातील पालघर लोकसभा मतदारसंघात 7 केंद्र असणार आहेत.

महिलांचा सहभाग वाढण्यास होणार मदत

सखी मतदान केंद्र उभारण्यात आल्याने महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्राची निवड करताना केंद्राच्या सुरक्षेचा विचार केला जाणार आहे. तहसील कार्यालय, पोलीस ठाण्याजवळील केंद्रे आणि अशा मतदान केंद्रांची निवड केली जाईल, जेथे निवडणूक अधिकारी सतत संपर्कात असणार आहेत. या केंद्रांवर फक्त महिला अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात महिला मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.

election Duty
Election Commission News : 8 राज्ये, 49 मतदारसंघ, 8.95 कोटी मतदार..! पाचव्या टप्प्याची ही आहेत वैशिष्टये...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com