Election Commission News : 8 राज्ये, 49 मतदारसंघ, 8.95 कोटी मतदार..! पाचव्या टप्प्याची ही आहेत वैशिष्टये...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले असून सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार शनिवारी थांबला आणि आता सोमवारी मतदान होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission News) तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या टप्प्यात आठ राज्यांतील 49 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. देशभरातील 8 कोटी 95 लाख मतदार मतदानाचा हक्के बजावणार आहेत. या टप्प्यांत महाराष्ट्रातील 13 मतदारसंघाचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाकडून पाचव्या टप्प्यातील तयारीची माहिती दिली आहे. पहिल्या चार टप्प्यांत 23 राज्यांमध्ये 379 लोकसभा मतदारसंघामध्ये (Lok Sabha Election 2024) मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या टप्प्यांत सरासरी 66 टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून 45 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्के बजावला आहे. (Latest Political News)

Election Commission
Lok Sabha Election 2024 : निवडणुकांसाठी ठाणे जिल्हा सज्ज; तब्बल 'इतक्या' केंद्रांवर होणार मतदान...

चौथ्या टप्प्यात आठ राज्यांतील 49 मतदारसंघात मतदान होणार आहे. तसेच ओडिशातील 35 विधानसभा मतदारसंघासाठीही (Assembly Election) मतदान आहे. लोकसभेच्या 8.95 कोटी मतदारांमध्ये 4.69 कोटी मतदान पुरूष तर 4.26 कोटी महिला आहे. 5 हजार 409 तृतियपंथी मतदारही हक्क बजावणार आहे. त्याचप्रमाणे वयवर्षे 85 हून अधिक मतदारांची संख्या 7.51 लाख एवढी आहे. शंभरहून अधिक वय असलेले मतदार जवळपास 25 हजार आहेत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाने मतदानासाठी (Voting) 153 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे दोन हजार फ्लाईंग स्कॉड, 2105 सर्व्हिलन्स टीम, 881 व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम, 502 व्हिडिओ विव्हिंग टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच २१६ आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके, 565 आंतरराज्य चेकपोस्टही असतील.

आठ राज्यांतील 94 हजार मतदान केंद्रांमध्ये 9 लाख 47 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था, शेड, स्वच्छतागृह, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि वीजपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Election Commission
Thane Lok Sabha 2024: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यावर चार हजार पोलिसांची नजर, पॅरामिलिट्री फोर्स,स्ट्रायकिंगच्या ३४ तुकड्या सज्ज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com