Corruption News : भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; प्रत्येकाची खडान् खडा माहिती गोळा होणार

Chandrashekhar Bawankule's Warning to Corrupt Officials : राज्यामध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. ज्यांना आमचं सरकार आणि अँटी करप्शन ब्युरो शोधत आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचं गंभीर प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. जमिनीच्या मोजणी व हद्द निश्चितीच्या कामासाठी 50 लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला होता. या आरोपांनंतर पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने भूमी अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र सध्या ते फरार आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणी तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली. या प्रकरणानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकार प्रशासनात छोटा पदावर राहून कोट्यावधींची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे जमवली आहे, अशांना शोधून काढून कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Chandrashekhar Bawankule
Pakistan Parliament : पाकिस्तान संसदेत मोठा निर्णय घेणार; आता राष्ट्रपतींनीच उचललं महत्वाचं पाऊल

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जमाबंदी आयुक्त कार्यालयामध्ये 5 ते 20 वर्षांपासून काही भ्रष्टाचारी लोक बसले आहेत. त्यांचा मी शोध घेणार आहे. अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यासारखा भ्रष्टाचाराच्या आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही शोधून काढणार आहे. आता त्यांना निलंबित करण्यात आले असून पुढील कालावधीमध्ये त्यांना बडतर्फ देखील करण्याची कारवाई करण्यात येईल. आमच्या सरकारच्या काळामध्ये मोजणीसाठी, मुद्रांक नोंदणीसाठी पैसे घेणे, हे चालू दिले जाणार नाही.

राज्यामध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. ज्यांना आमचं सरकार आणि अँटी करप्शन ब्युरो शोधत आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्या प्रत्येकाचा शोध घेतला जाणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांची नोकरीवर असताना त्यांची संपत्ती किती होती आणि आता किती आहे, यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

Chandrashekhar Bawankule
Sushma Andhare Vs Anjali Damania : 'धनंजय मुंडेंची शिकार तुम्ही केली या...', अंजली दमानियांना सुषमा अंधारेंनी धू धू धुतले

राजकारणामध्ये असलेल्या आम्हा सर्वांना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रॉपर्टीचं विवरण द्यावं लागतं. त्यामुळे प्रशासनातील छोट्या पदावरती राहून कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जमा केली आहे, विविध शहरात त्यांची प्रॉपर्टी आहे, अशांचा तपास करून त्या सगळ्यांना शोधून काढणार आहोत. आमच्या महसूल विभागात असे अधिकारी आहेत, त्यांना देखील मी शोधून काढणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

बावनकुळे पुढे म्हणाले, सरकारने आजपासून वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात जिल्ह्यातील कोणत्याही भागातील नोंदणी करता येणार आहे. मुळशीतील नोंदणी पुणे किंवा पिंपरी चिंचवड मध्ये करता येणार आहेत. तसंच पुण्यातील नोंदणी ही मुळशी मध्ये देखील होऊ शकणार आहे.

सध्या सरकार वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन नंतर वन स्टेट वन रजिस्ट्रेशन ही देखील योजना घेऊन येणार आहे. त्यानुसार पुण्यामधून नागपूर मध्ये घेतलेल्या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि हे रजिस्ट्रेशन फेसलेस असणार आहे. फक्त आधार कार्डच्या माध्यमातून देखील हे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. राज्य सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com