IAS Tukaram Mundhe: सिर्फ नाम ही काफी है..! तुकाराम मुंढे; 20 वर्षांतील 24 वी बदली; नेत्यांना ते का आवडत नाहीत?

Tukaram Mundhe Transfer News: कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित असलेल्या आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.ते आता दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
Tukaram Mundhe Transfer
Tukaram Mundhe TransferSarkarnama
Published on
Updated on

आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे आपल्या कठोर निर्णयामुळे ओळखले जातात. प्रशासनातील काही नेते अन् सत्ताधारी काही नेत्यांना मुंढे यांची प्रशासनात काम करण्याची 'स्टाइल' आवडत नाही. मुढेंच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे, तर अनेक नेत्यांना मुंढे 'अडचणी'चे ठरतात.तुकाराम मुंढे यांची ज्या ठिकाणी बदली होते, त्या विभागातील अनेक अधिकारी, जिल्ह्यातील नेत्यांची धडधड वाढत असते.

गेल्या 20 वर्षांत त्यांची 24 व्यांदा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचा हा नुसता आकडा नाही, तर त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय सेवेतील अविभाज्य भाग बनला आहे. तुकाराम मुंढे आणि बदली हे जणू समीकरण बनलं आहे. असंघटीत कामगार आयुक्त पदावरुन त्यांची बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली आहे.

सोलापुरातून त्यांचा प्रशासकीय प्रवास सुरु झाला. नागपूर, नाशिक, जालना, सोलापूर,मुंबईंसह राज्यभर त्यांचा प्रशासकीय प्रवास सुरु आहे. या सर्व ठिकाणी त्यांचा कामातील समान धागा म्हणजे काम करण्याची त्यांची सडेतोड शैली, सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा अधिकारी अशीच आहे. नाशिक येथे आदिवासी विभागाचे आयुक्त असतांना त्यांची घेतलेल्या निर्णयामुळे हजारो नागरिकांना लाभ झाला. सोलापुरात कार्यरत असताना त्यांनी आषाढी वारी दरम्यान होत असलेल्या नदी प्रदुषणावर पार्श्वभूमीवर तीन हजार स्वच्छतागृह बांधली होती. तसेच मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्थाही त्यांनी बंद केली होती.

Tukaram Mundhe Transfer
Kabutarkhana News: दादरच्या कबुतरखान्याजवळ मोठा राडा; जैन समाज रस्त्यावर,ताडपत्री फाडली

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी 'कमिशनर मॉर्निंग वॉक' हा उपक्रम राबवला होता. नागरिक सकाळी त्यांना उद्यानात भेटायला येत असत. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या जागेवर सोडवण्याचा मुढे यांनी प्रयत्न केला होता. 'कमिशनर मॉर्निंग वॉक' मधून ते थेट जनतेशी संवाद साधत होते.

त्यांचा सडेतोड स्वभाव हाच त्यांचा बदलीचं कारण ठरत असतो. ते राजकीय दबावाला कधीही जुमानत नाहीत. त्यांनी घेतलेले निर्णय लोकप्रतिनिधींना आवडत नाहीत, पण मुंढेंना त्याची पर्वा नसते. नियमांच्या चौकटीत राहून सशक्त प्रशासकीय सेवा करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात.

सध्या त्यांनी नियुक्ती ही दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे, प्रशासकीय सेवेत एका अर्थानं हा विभाग अन्य विभागाच्या तुलनेत कमी महत्वाचा समजला जातो, असे असले तरी मुंढे हे असे अधिकारी आहेत की ज्या ठिकाणी ते रुजू होतात, तो विभाग त्यांच्या कार्यशैलीनं महत्वपूर्ण ठरतो.

  1. तुकाराम मुंढे यांची किती वेळा बदली झाली आहे?
    त्यांची 20 वर्षांत 24 वेळा बदली झाली आहे.

  2. त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये काय आहेत?
    त्यांनी सडेतोड निर्णय, शिस्तप्रिय धोरणे आणि लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत.

  3. मुंढेंनी कोणते उपक्रम प्रसिद्ध केले?
    'कमिशनर मॉर्निंग वॉक', व्हीआयपी दर्शन बंदी, आणि नदीप्रदूषण नियंत्रणासाठी स्वच्छतागृह उभारणी.

  4. त्यांच्या बदल्यांमागचं कारण काय मानलं जातं?
    राजकीय दबावाला न झुकता कठोर निर्णय घेणं हे मुख्य कारण मानलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com