

Human Trafficking in Maharashtra : बेपत्ता होणाऱ्या लोकांचे वाढते प्रमाण आणि अशा लोकांना शोधण्याच्या मोहिमेत पोलिसांमध्ये आलेल्या शिथिलतेची दखल घेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या मुख्य सचिव तसेच पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्रासह राजस्थान, बिहार, ओडिशा आणि तेलंगण या राज्यांना ही नोटीस बजावत उत्तर मागविण्यात आले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडील आकडेवारीनुसार मानव तस्करीच्या सर्वाधिक घटना वरील राज्यांत होत आहेत.
बिहारमध्ये वर्ष २०१३ पासून दर वर्षी १२ ते १४ हजार लोक बेपत्ता होत असल्याचे एका अहवालाद्वारे समोर आले होते. बेपत्ता होणाऱ्यांत मुलांचे प्रमाण जास्त असून यातील केवळ दोन तृतीयांश मुलांचा शोध लागतो.
अल्पवयीन मुलांच्या तस्करीत ओडिशा आघाडीवर असून बिहार राज्य यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अल्पवयीन मुलींच्या तस्करीमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे.
बेपत्ता लोकांच्या स्थिती संदर्भातील ताजी आकडेवारी दोन आठवड्यांच्या आत सादर केली जावी, असे ‘एनएचआरसी’ने नोटिशीत म्हटले आहे. बेपत्ता लोकांना भीक मागणे, बाल श्रम, वेश्यावृत्ती आणि इतर अवैध कामांमध्ये गुंतवले जात असल्याचा संशय आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय आहे?
विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रामध्ये 2024 मध्ये 45 हजार 662 महिला बेपत्ता झाल्या होत्या. तर 30 हजार 877 महिला सापडल्या आहेत. त्याचवेळी 11 हजार 316 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यात 8 हजार 475 मुली पुन्हा सापडल्या.
2025 मध्ये 48 हजार 278 महिला बेपत्ता झाल्या होत्या. तर 36 हजार 581 महिला सापडल्या आहेत. त्याचवेळी 12 हजार 316 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यात 10 हजार 295 मुली पुन्हा सापडल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.