BMC River Scam : सत्तांतर होताच मुंबई महापालिकेतील घोटाळा उघडकीस, 10 हजार कोटींच्या ठेवी घटल्या; तर मिठी नदीच्या कामात 65 कोटींचा गफला...

BMC Mithi River Scam : मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम 2012 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पालिकेला दिलं होतं. मात्र, या कामात खोटे पुरावे दाखवल्याचा आरोपही सामंत यांनी केला. ते म्हणाले, दाखवलेल्या पुराव्यांमध्ये तब्बल साडेतीन लाख फोटोंची तपासणी सुरू असून यातील दोन लाख फोटो स्कॅन केली आहेत.
Mithi River Scam | BMC Desilting Scam
Authorities investigate the Mithi River desilting scam in Mumbai after allegations of a ₹65 crore fraud and irregularities in civic projects.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 14 Feb : मुंबई महापालिकेत सत्तांतर होताच आता महापालिकेकडून मागील काळात केलेल्या कामांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीत आता मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील 65 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे.

तसंच 1200 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर प्रकल्पातील कामात अनियमिततेचे आरोप असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. त्यामुळे आता मागील काळात काम केलेल्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

शुक्रवारी विधानसभेत बोलताना उदय सामंत यांनी महानगरपालिकेच्या 2012 मधील 91 हजार कोटींच्या मुदतठेवी घटून 81 हजार कोटींवर माहिती दिली. यावेळी त्यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील 65 कोटींचा घोटाळा झाल्याचं आतापर्यंत उघड झालं असून याबाबतचा आणखी तपास सुरू असल्याचं सांगितलं.

Mithi River Scam | BMC Desilting Scam
Pune PMC : पुण्यात प्रशांत जगतापांच्या डावात अख्खा भाजप फसणार? काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्यास 'श्रीनाथ भिमालें'वर गरीब जनता नाराज होणार?

मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम 2012 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पालिकेला दिलं होतं. मात्र, या कामात खोटे पुरावे दाखवल्याचा आरोपही सामंत यांनी केला. ते म्हणाले, दाखवलेल्या पुराव्यांमध्ये तब्बल साडेतीन लाख फोटोंची तपासणी सुरू असून यातील दोन लाख फोटो स्कॅन केली आहेत.

या चौकशीत एकाच डम्पर आणि ट्रॅक्टरचा वापर करून नदीतील गाळ वारंवार काढल्याचं दाखवण्यात येत असल्यामुळे घोटाळ्याचा संशय असल्याचं ते म्हणाले. शिवाय उरलेल्या फोटोंची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Mithi River Scam | BMC Desilting Scam
Pune PMC News : होऊ दे खर्च..! पुणे महापालिकेच्या निवडणुकीला दोन महिने उलटत नाही, तोच कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोंची उधळपट्टी

दरम्यान, पालिकेच्या 1200 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर प्रकल्पातही अनियमिततेचे आरोप आहेत. शहर सुशोभीकरण आणि बॅरिकेडिंगच्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय असल्यामुळे या संदर्भातील 380 कोटींच्या पुढील निविदा प्रस्ताव सरकारने रद्द केल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. तसंच मिठी नदी घोटाळ्याशी संबंधित आतापर्यंत 12 जणांना अटक केल्याचही सामंत यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com