Lok Adalat News : लोकअदालतीत ई-चलानला ‘नो एंट्री’; आर्थिक फसवणुकीची भीती, पोलिसांनी केलं सतर्क

E-challan compromise not allowed : ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत याबाबत सामाजिक माध्यमांवरील अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
E-challan compromise not allowed
E-challan compromise not allowedSarkarnama
Published on
Updated on

Lok Adalat cases Maharashtra : राज्यभरात येत्या १३ डिसेंबरला लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लोकअदालतीमध्ये ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याचा खोटा प्रचार केला जात असून त्यामाध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईतील वाहतूक शाखेच्या अपर पोलीस महासंचालकांनी याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून प्रलंबित ई-चलान प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी वाहतूक विभागाकडून महाराष्ट्र राज्य विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगामी लोकअदालतीत वाहतूक विभागाकडून कोणतीही ई-चलान प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार नाहीत.

काही यूट्यूब, इंस्टाग्राम तसेच अन्य सामाजिक माध्यमांवर १३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा अफवांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

E-challan compromise not allowed
Assembly Session : विधिमंडळाच्या इतिहासात विरोधकांवर पहिल्यांदाच 'ही' नामुष्की; फडणवीस-शिंदे-पवारांनी कामच असं केलंय...

ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत याबाबत सामाजिक माध्यमांवरील अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. कोणत्याही अनधिकृत लिंकद्वारे ई-चलानची रक्कम भरणा करू नये, असा सावधानातेचा इशाराही देण्यात आला आहे.  

E-challan compromise not allowed
Raigad Fort news : धक्कादायक : रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टोरंट, कॅफे आणि सिमेंट काँक्रीटचे भव्य राजवाडे..! संभाजीराजे भडकले

जर एखाद्या नागरिकाचे प्रकरण स्थानिक जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी ठेवले असल्यास, संबंधित न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीसांशी थेट संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com