

NEET परीक्षा 21 जून रोजी असल्यामुळे महाटीईटी परीक्षा पुढे ढकलली
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 28 जून 2026 रोजी होणार
पेपर 1 सकाळी 10.30 ते 1.00, तर पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.00 दरम्यान
प्रवेशपत्र डाउनलोड प्रक्रिया 16 जूनपासून सुरू होणार
MahaTET exam postponed: महाटीईटी 2026 परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून राज्य परीक्षा परिषदेने नव्या तारखेची घोषणा केली आहे. उमेदवारांनी सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्राबाबतची माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य परीक्षा परिषदेने महाटीईटी 2026 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा 21 जून रोजी होणार होती. मात्र, त्याच दिवशी राष्ट्रीय स्तरावरील NEET परीक्षा आयोजित करण्यात आल्याने आता महाटीईटी परीक्षा 28 जून रोजी घेण्यात येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे याबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. NEET आणि महाटीईटी या दोन्ही परीक्षांची अनेक केंद्रे समान असल्यामुळे प्रशासनासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे परीक्षार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा परिषदेच्या माहितीनुसार, महाटीईटीचा पेपर क्रमांक 1 हा 28 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे. तर पेपर क्रमांक 2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेतला जाणार आहे.
दरम्यान, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया 16 जूनपासून सुरू होणार असून उमेदवारांना 28 जूनपर्यंत ऑनलाइन प्रवेशपत्राची प्रिंट काढता येणार आहे.
काही प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात पुन्हा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ mahatet.in वर अपडेट तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.