MPSC News: मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख ठरली! 6 जुलैला होणार परीक्षा…

MPSC: राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेत स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिलं. मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करुन आरक्षण दिल्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
MPSC Exam News
MPSC Exam NewsSarkarnama

MPSC Civil Services Pre-Examination: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही शनिवार 6 जुलै 2024 रोजी होणार आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी (Civil Services Pre-Examination) 29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार 274 पदांसाठी 28 एप्रिल 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय घेत स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिलं. मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करुन आरक्षण दिल्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच आता राज्य शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेमधून विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेत स्थळावर देण्यात आला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा 6 जुलै रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी 9 मे ते 24 मे 2024 असा आहे.

MPSC Exam News
Code of Conduct Violations News : बारामती लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा पाऊस !

एकूण 'इतकी' पदे भरली जाणार

राज्यसेवा परीक्षेमार्फत एकूण 431 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी गट - अ 7 पदे, सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ 116 पदे, गटविकास अधिकारी, गट-अ 52 पदे, सहायक संचालक- 43 पदे, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी 3 पदे अशा एकूण 524 पदांचा तपशील आयोगाकडून देण्यात आला आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com