असाही संघर्ष : वयाच्या पाचव्या वर्षी अनाथ झालेला नारायण बनला साहेब!

राज्य सरकारने अनाथ बालकांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण दिलं आहे.
Yashomati Thakur and Narayan Ingle
Yashomati Thakur and Narayan Ingle
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नुकत्याच झालेल्या परीक्षेत नारायण इंगळे या तरूणालाही यश मिळालं आहे. हा तरूण अनाथ असून त्याला वनक्षेत्रपाल (RFO) म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अनाथ संवर्गातील आरक्षणातून अधिकारी झालेला नारायण हा पहिला तरूण ठरला आहे.

राज्य सरकारने अनाथ बालकांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण दिलं आहे. यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने सातत्याने पाठपुरावा केला होता. या आरक्षणाद्वारे नारायण इंगळे या तरुणाला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रादेशिक वन अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच आई-वडिलांचे छत्र हरपलेला नारायण पोलिसांना रेल्वे स्थानकात सापडला होता.

Yashomati Thakur and Narayan Ingle
पंकजा मुंडे पुढील दोन ते चार दिवस कुणालाच भेटणार नाहीत!

नारायण इंगळे हा मुळचा लातूर येथील आहे. लातुर जिल्ह्यातील मुरूड येथे 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले व पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. महिला व बालविकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी नारायण इंगळे याचे कौतूक केलं आहे. तसेच त्यांनी गुरूवारी त्याच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधत संवादही साधला. भविष्यातही आपण कायम सोबत असल्याची ग्वाही त्यांनी नारायण याला दिली. यापुढे होतकरू अनाथ बालकांना आरक्षणाद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होईल, असा ठाकूर यांनी व्यक्त केला. शुक्रवारी त्यांनी नारायण याची भेट घेत शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अनाथांचे अ, ब आणि क अशा तीन प्रवर्गात वर्गीकरण करून शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनाथ मुलांना खुल्या संवर्गातून लागू करण्यात आलेल्या एक टक्का समांतर आरक्षणाऐवजी दिव्यांगांच्या धर्तीवर एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेली आहे.

अनाथ आरक्षणासाठी पंदाची गणना पदभरतीच्या तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी एकूण पदसंख्येच्या एक टक्का इतकी लागू केली जाणार आहे. या आरक्षणातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी निश्चित केलेले निकष लागू केले जातील. अनाथ मुलांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक शुल्क तसेच उच्च शिक्षणासाठी शासकीय महाविद्यालयांध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांच्या शैक्षणिक शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती महिला व बाल विकास विभागाकडून केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com