पंकजा मुंडे पुढील दोन ते चार दिवस कुणालाच भेटणार नाहीत!

डॉक्टरांनी त्यांना न बोलण्याचा सल्ला दिला आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde
Published on
Updated on

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुढील दोन ते चार दिवस कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कालावधीत त्या फोनवरही बोलणार नाहीत. अतिवृष्टी झालेल्या भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे त्यांनी पॅकेजची घोषणा करण्याची मागणी गुरूवारीच केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी जोरदार टीका केली होती.

पंकजा मुंडे यांच्या घशाला संसर्ग झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना न बोलण्याचा सल्ला दिला आहे. म्हणूनच पुढील दोन ते चार दिवस कुणालाही भेटणार किंवा फोनवर बोलणार नसल्याचे ट्विट त्यांनी केलं आहे. मागील काही दिवसांत बीडसह मराठवाड्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. शेतपीकांचे मोठं नुकसान झालं आहे. पंकजा यांनी अनेक भागांत जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणीही केली आहे. मात्र, आता प्रकृती ठीक नसल्याने कुणाला भेटू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Pankaja Munde
भाजपला धक्का; आणखी एका आमदाराची सोडचिठ्ठी

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात जाऊन पाहणी केली. या दौऱ्यात ते मराठवाड्यातील भागाचीही पाहणी करणार आहेत. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचाही पाहणी दौरा होणार आहे.

पंकजा मुंडे यांची सरकारवर टीका

मराठवाड्यात एकीकडे पुराने थैमान असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सोहळे सुरु होते, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गुरूवारी केली होती. मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुंडे यांनी तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. तसेच केवळ पिकांना नाही तर वाहून गेलेली जमीन, गुरंढोरे, मालमत्तेचे नुकसान यासाठीही पॅकेजची घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

पंकजा म्हणाल्या, पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी सर्वात आधी प्रशासन आणि शासन यांनी काम केले पाहिजे. पालक मंत्र्यांनी प्रत्येक बारीक विषय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यापर्यंत नेला पाहिजे. आधी पालकमंत्र्यांनी आपआपल्या जिल्ह्यात गेले पाहिजे. पहिले खासदार प्रीतम मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्याच्या बांधावर गेले. प्रीतम मुंडे बांधावर होत्या त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठमोठे सोहळे चालले होते, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com