Nashik Corporation Scam : कोट्यवधींचा धनादेश घोटाळा, रजेवर जाऊनही आयुक्तांचा पिच्छा सोडेना!

Bjp On Ashok Karanjkar : महापालिका स्थायी समितीचे सभापतींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभे केले असून आयुक्त रजेवरून परत येण्यापूर्वी त्यांना आव्हान दिलं आहे.
ashok karanjkar .jpg
ashok karanjkar .jpgsarkarnama
Published on
Updated on

Nashik Corporation News : बिल्डरांच्या अनावश्यक जमिनी संपादित करण्यात आल्या. या जमिनींचे 55 कोटींचे धनादेश एका रात्रीत महापालिका आयुक्तांनी दिले. त्यामुळे या घोटाळ्यावरून आयुक्त अशोक करंजकर अडचणीत आले आहेत.

बांधकाम व्यवसायिकांच्या घोटाळ्यांचा हा धनादेश महापालिका आयुक्तांचा पिच्छा सोडेना. यावरून राजकीय पक्षांनी आयुक्तांवर गंभीर आरोप केले. स्थानिक शेतकरी गेले वीस वर्ष संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत.

या शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेने त्यांना दाद दिली नाही. याबाबतचे 471 शेतकऱ्यांचे मोबदला देण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. असे असताना महापालिका आयुक्त यांनी बांधकाम व्यवसायिकांना पैसे अदा केले. त्यामुळे महापालिका आयुक्त राज्य शासनाच्याही निशाण्यावर आले आहेत. या सर्व आरोपांमुळे त्रस्त झालेले आयुक्त पंधरा दिवसांच्या रजेवर गेले होते. त्यांची रजा संपून ते कामावर रुजू होणे अपेक्षित आहे.

मात्र, ते कामावर महापालिकेत रुजू होण्याआधीच शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे रजेवर जाऊनही संशयास्पद धनादेश प्रकरणाच्या आरोपांचा इच्छा त्यांना सोडवता आलेला नाही. आता आयुक्तांनी ठाणे महापालिकेत बदली करून घेण्यासाठी धडपड सुरू केल्याची चर्चा आहे.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभारले आहे. रजेवरून परत येण्याआधीच त्यांनी पुन्हा एकदा आयुक्तांना आव्हान दिले आहे.

ashok karanjkar .jpg
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ आता गुजरातचे पाणी वळवणार?

"राज्य शासनाने या संदर्भात महापालिका आयुक्तांवर कडक कारवाई करावी. बांधकाम व्यवसायिकांना दिलेल्या धनादेश प्रकरणाची आणि त्यातील घोटाळ्याची चौकशी करावी. हे प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत राज्य सरकार आणि महापालिका आयुक्तांचा पिच्छा सोडणार नाही," असा इशारा निमसे यांनी दिला आहे.

"महापालिकेने शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करूनही वीस वर्ष मोबदला देण्यासाठी त्यांना ताटकळत का ठेवण्यात आले. या आरोपाला सामोरे जावेच लागेल. महापालिका आयुक्तांनी या संदर्भात स्वतःच पुढे येऊन खुलासा केला पाहिजे. त्यांनी खुलासा न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. या सर्व शेतकऱ्यांनी सहकुटुंब महापालिका कार्यालयाला घेराव घालण्याची तयारी केली आहे," असे निमसे यांनी सांगितले.

ashok karanjkar .jpg
Chhagan Bhujbal : अंगणवाडी उदघाटनाला न बोलावल्याने मंत्र्याचा जळफळाट, धाडली नोटीस

या संदर्भात भारतीय जनता पक्षाला त्यांच्याच नेत्यांनी घरचा आहेर दिला आहे. याविषयी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानेच आक्रमक भूमिका घेत आरोप केले आहेत. आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि नगर विकास मंत्री हेदेखील बचावात्मक स्थितीत आहेत.

महापालिकेच्या 55 कोटींचा हा भूसंपादनाचा घोटाळा भारतीय जनता पक्ष आणि महापालिका आयुक्त यांच्या चांगल्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. यावर पुन्हा एकदा जोरदार राजकारण सुरू झाल्याने महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.


( Edited BY : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com