Dilip Mohite On Jogendra Katyare: पुण्याचे कलेक्टर दिवसे-कट्यारेंमधल्या वादाला मोहितेंकडून राजकीय तडका; अधिकाऱ्यांत खमंग चर्चा

Complaint against Pune Collector Jogendra Katyare: आपण दिवसेंना काही सांगितलेच नाही. कट्यारेंविरोधात उगाचच काही करण्याचा संबंध नसल्याचे सांगून या प्रकरणात विनाकारण आपले नाव घेतले जात आहे,असे सांगण्याचा प्रयत्नही मोहिते आता करीत आहेत.
Dilip Mohite On Jogendra Katyare
Dilip Mohite On Jogendra KatyareSarkarnama

Pune News: पुण्याचे कलेक्टर सुहास दिवसे यांच्या'वर्किंग स्टाइल'कडे उघड उघड बोट दाखवून, ते प्रचंड त्रास देत असल्याचे खेडचे प्रातांधिकारी जोगेंद्र कट्यारेंचे पत्र मीडियापुढे आले आणि प्रशासकीय व्यवस्थेत गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी कान भरल्यानेच दिवसे 'टार्गेट' करीत असल्याचे कट्यारेंनी पत्रातून सांगितले.

यानिमित्ताने दिवसेंच्या कारभाराची चर्चा होऊ लागली आहे. या वादात कट्यारे यांनी मोहितेंनाही ओढल्याने आमदारसाहेबही संतापले आहेत. कट्यारे यांच्या तक्रारींवर सगळीकडे 'बवाल' झाल्याने मोहितेंनी जोरदार प्रतिक्रिया देऊन, दिवसे-कट्यारे वादाला राजकीय फोडणी मिळाली आहे.

'भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आपण आवाज उठवतो. अशा लोकांची चौकशी झालीच पाहिजे. आता 'दूध का दूध और पाणी का पाणी' होऊच द्या, अशा शब्दांत चॅलेंज करीत मोहितेंनी अधिकाऱ्यांमधील वाद पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण दिवसेंना काही सांगितलेच नाही. कट्यारेंविरोधात उगाचच काही करण्याचा संबंध नसल्याचे सांगून या प्रकरणात विनाकारण आपले नाव घेतले जात आहे, असे सांगण्याचा प्रयत्नही मोहिते आता करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dilip Mohite On Jogendra Katyare
Pune Collector Suhas Diwase: कलेक्टर सुहास दिवसेंचा त्रास; आत्महत्येची वेळ आलीय! प्रांताधिकाऱ्याचा 'लेटरबॉम्ब'

अजित पवारांचे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 'वजन' वाढले आहे. पुण्याचे 'कलेक्टर' झालेल्या सुहास दिवसेंवर त्यांच्याच 'टीम'मधील प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे (Jogendra Katyare)यांनी गंभीर आरोप केले. 'दिलीप मोहिते यांच्या सांगण्यावरून दिवसे हे मानसिक छळ करीत आहेत. दिवसेंच्या त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, असे जाहीरपणे सांगून कट्यारे यांनी प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे. कट्यारे यांच्यासारख्या अधिकाऱ्यानेच दिवसेंविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याने दिवसे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

Dilip Mohite On Jogendra Katyare
Vijay Tad murder case: माजी नगरसेवकाचा खून; पोलिसांना गुंगारा देणारा माजी उपनगराध्यक्ष न्यायालयात शरण

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite)आणि दिवसे हे ठरवून त्रास देत असल्याचेही कट्यारे यांनी पत्रात म्हटले आहे. आमदार मोहिते यांची कामे करीत नसल्यानेच ही वेळ आल्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले आहे. म्हणजे, अजित पवारांचे समर्थक आमदार मोहिते आणि दिवसे हे जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची बाब कट्यारे यांच्या पत्रातून दिसत आहे. परिणामी, या प्रकरणाची चौकशी होऊन नेमके सत्य बाहेर येईल मात्र, त्याआधी या 'व्हायरल' पत्रामुळे जिल्हा प्रशासनाच्या कारभाराची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com