

येत्या नवीन वर्षांच्या सुरवातीलाच महागाईचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुपयांचे ऐतिहासिक अवमूल्यन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढती मागणी यामुळे काही वस्तुंच्या किमंती वाढणार आहेत. याबाबतचे संकेत कंपन्यांनी दिले आहेत.
जानेवारी २०२६ पासून लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन आणि कार यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ सुमारे 10 टक्के असणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यामुळे आयातीचा खर्च प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे उत्पादनाची एकूण किंमत वाढली आहे.
काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केला होता, त्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता, पण हा आनंद फार काळ टिकणार नसल्याचे चित्र आहे. ३२ इंच किंवा त्याहून मोठ्या टीव्ही स्क्रीनवर जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणून ग्राहकांना दिलासा दिला होता.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या मागणीमुळे जगभरात चिप्सची टंचाई निर्माण झाली आहे. अशातच डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण होत आहे, या दोन कारणामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
विविध कंपन्यांच्या मीडिया रिपोर्टनुसार, या इलेक्टॉनिक वस्तूंच्या किंमतीत किमान 5 ते 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जर अशीच परिस्थिती काहीली तर याव वाढ होऊन ती १० टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती उद्योगविश्वास आहे. एआय चिपच्या किंमती ५०० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
लॅपटॉप, टीव्ही आणि स्मार्टफोनसारख्या वस्तूंसाठी लागणारे ‘ओपन सेल’, सेमीकंडक्टर चिप्स आणि मदरबोर्ड यांसारखे ७० टक्क्यांहून अधिक घटक आयात करावे लागतात, रुपया घसरल्यामुळे या वस्तूंच्या किंमतीत वाढ होईल. गेल्या सप्टेंबर महिन्यात सरकारने जीएसटी दर कपातीची घोषणा केली होती.
त्याच प्रमाणे केंद्र सरकारने 'केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा),२०२५' अधिनियमाची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये तंबाखू आणि त्यापासून बनलेल्या सर्व उत्पादनांवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे. या निर्णयामुळे सिगारेट, हुक्का, तंबाखू चघळणे आणि जर्दा यांसारखे सर्व तंबाखूजन्य पदार्थ महागणार आहेत.
AI च्या वाढत्या मागणीमुळे मेमरी चिपची वाढ अतिशय झपाट्यानं झाली आहे. हा घटक AI तंत्रज्ञानात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. Advance Memory सारख्या 'हायबँडविड्थ मेमरी'ची मागणी वाढली आहे. पुरवठा कमी असल्या कारणानं फक्त टीव्हीच नव्हे तर, कार, स्मार्टफोन, लॅपटॉप अशा गोष्टींचे दर येत्या काळात प्रचंड प्रमाणात वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.