रत्नागिरी : दापोली पोलिस ठाण्याला (Dapoli Police Station) काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीबाबत भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जिल्हा पोलिस दलाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. (Nilesh Rane news)
याबाबत त्यांनी प्रसिद्धिला दिलेल्या म्हटले आहे की, दापोली पोलिस ठाण्याला 14 मे 2022 या दिवशी सकाळी आग लागली. त्यात अनेक महत्वाची कागदपत्रे जाळून गेली. गेल्या दीड वर्षांपासून दापोली पोलिस ठाणे हे महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती ठरले आहे. याच तालुक्यातील आसूद येथे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचे आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे या दापोली पोलिस ठाण्यात होती. हे प्रकरण शेवटच्या टप्प्यावर असताना येथील कागदपत्रे 14 मे रोजी लागलेल्या आगीत जळून गेल्याची भीती सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
येथील पोलिस ठाण्याला लागलेल्या आगीबाबत राणे यांनी थेट पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, एसपींचे सरकारी निवासस्थान दापोलीपासून तब्बल चार तासांच्या अंतरावर असताना आग लागल्यानंतर ते अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी कसे पोहोचले हा प्रश्नच आहे. पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टप्रकरणी गेले दोन महिन्यांपासून एसपींच्या दापोलीतील फेर्या वाढल्या आहेत. याबाबत लवकरच माहिती उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राणे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे दापोली पोलिस ठाण्यात आगीच्या प्रकरणाला वेगळे आणि गंभीर वळण लागले आहे. रत्नागिरीच्या कारागृहात प्रदीप गर्ग नावाच्या फसवणुकीच्या केसमध्ये दखल झालेल्या कैद्याला गर्ग या आडनावामुळे विशेष ट्रीटमेंट मिळत आहे, असा आरोपही नीलेश यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.