Radhakrishna Vikhe : तलाठी नव्हे, आता 'ग्राम महसूल अधिकारी', महसूल मंत्री विखेंची घोषणा

Gram Revenue Officer : तलाठी संघटनेच्या नावातही बदल करण्यास राज्य सरकारची मान्यता दिल्याची माहिती
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Talathi News : महसूल विभागाचा ग्रामीण भागात महत्त्वाचा चेहरा म्हणून ज्याची ओळख असते तो तलाठी. गावातील सर्वांचा सातबारा तलाठ्याच्या हाती असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात एक म्हण देखील तलाठीसाठी प्रसिद्ध आहे. 'जे नसे ललाटी, ते लिही तलाठी', अशी ती म्हण. पण आता तलाठी या पदनामात बदल करण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केली. याशिवाय तलाठी संघटनेत बदल करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिल्याचेही मंत्री विखे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. महसूल मंत्री विखे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी तसेच राज्यातून आलेले तलाठी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil
Parbhani Loksabha Constituency : महायुती - महाआघाडी नावालाच, परभणीत स्थानिक पातळीवर अजूनही...

संघटनेची मागणी लक्षात घेवून मंत्री विखे म्हणाले, "तलाठी या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी या नावास तत्वता मान्यता देण्यात येत असल्याचे सांगून तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित होती".

राज्यातील युती सरकारने याबाबत निर्णय करून आता संघटनेचे नाव महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, असे करण्यास मान्यता दिली आहे. सरकारचा आदेशच मंत्री विखे यांनी यावेळी अधिवेशनात दाखवला.

यापूर्वी 'एक सज्जा, एक कोतवाल', असे धोरण घेण्यात आले असून 3 हजार 110 सजे निर्माण करण्यास सरकारने मान्यता देण्यात आल्याचे सांगतानाच महसूल सहायक आणि तलाठी संवर्गतील 10 वर्ष सलग सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मर्यादीत विभागीय स्तरावर स्पर्धा परीक्षांना संधी देण्यासाठी निर्णय सरकार निश्चित करेल, आशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.

महसूल विभागाचा चेहरा असलेले तलाठी सरकार प्रमाणेच सामाजिक बांधिलकीने काम करीत आहेत. कोणतेही सकंट, असो आव्हानात्मक परिस्थितीत सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण बजावत असलेल्या भूमिकेला सलाम करण्यासाठी या अधिवेशनात उपस्थित असल्याचे मंत्री विखे सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात चंद्रकांत खैरेंची उमेदवारी फिक्स ?

तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शी

तलाठी भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. परंतु केवळ सरकारची बदनामी करण्यासाठी आरोप केले जात आहे. विरोधकांच्या आरोपामुळे तुम्ही सुध्दा बदनाम होत असल्याची जाणीव करून आपल्या संघटनेने पुढे येवून या आरोपांचा निषेध करण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com