PCMC News : एका दिवसात 'PCMC'च्या 8 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला, कारण...

Pimpri-Chinchwad News : "13 मार्च 2022 ला पिंपरी महापालिकेची मुदत संपली. तेव्हापासून म्हणजे अडीच वर्षापासून शहरात प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत ती सुरु राहिली आहे. भविष्यातही कधी महापालिका निवडणूक होईल, हे निश्चीत नाही."
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News, 29 Sep : लाचखोरीसह फसवणुकीसारख्या फौजदारी गुन्ह्यांत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा कर्मचारी, अधिकाऱ्यांना गेल्यावर्षी आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी घरचा रस्ता दाखवला होता.

तर, यावर्षी एकाच दिवसात महापालिकेच्या आठ कर्मचाऱ्यांनी थेट नोकरीचा राजीनामा नुकताच दिला. मात्र, त्यातून महापालिका (Municipalities) प्रशासनाला सुखद धक्काच बसला आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. गेल्यावर्षी कर्मचारी, अधिकारी सस्पेंड करण्यााची रेकॉर्डब्रेक कारवाई पिंपरी महापालिकेत झाली.

त्यामुळे प्रशासकीय कारभारावर सडकून टीका झाली होती. 13 मार्च 2022 ला पिंपरी महापालिकेची मुदत संपली. तेव्हापासून म्हणजे अडीच वर्षापासून शहरात प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत ती सुरु राहिली आहे. भविष्यातही कधी महापालिका निवडणूक होईल, हे निश्चीत नाही.

दुसरीकडे पदाधिकारीच नसल्यापासून महापालिकेचा कारभार बेशिस्त आणि भोंगळ झाला आहे. विक्रमी संख्येने या कालावधीत कर्मचारी, अधिकारी हे निलंबित झाले. त्यामुळेप्रशासनाची नाचक्की झाली. प्रशासकीय राजवट म्हणजे आयुक्तांचा कारभार वादात सापडला असतानाच यावर्षी एकाच दिवशी म्हणजे 25 सप्टेंबरला आठ महापालिका कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यात बहूतांश लिपिक (क्लार्क) आहेत.

Pimpri-Chinchwad
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नव्हे हत्या? आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

मात्र, त्यांनी पक्ष सोडण्यामागे लाचखोरी, गुन्हे, घोटाळा नाही. त्यातील काही पिंपरी महापालिकेत (Pimpri-Chinchwad) सेवा बजावत असताना त्यांची इच्छा, आवड, रुची यानुसार दुसरी नोकरी मिळविण्याची तयारी सुरु होती. त्यात ते यशस्वी झाले. त्यातून त्यांना अधिक पगाराची, दोघांना प्रतिष्ठेची, एका वरच्या पदावर सरकारीच जॉब मिळाला. त्या्मुळे त्यातील काहींनी काहीच दिवसांत, तर इतरांनी अवघ्या काही महिन्यांत पिंपरी महापालिका सेवेचा स्वताहून राजीनामा दिला.

दोन लिपिक चैताली कळसकर आणि पवन काटे हे तलाठी झाले. त्यांना ती नियुक्ती मिळाल्याने त्यांनी लिपिकपदाचा राजीनामा दिला. तर, अश्विनी खवले, उमेश बागडकर आणि किशोर खवरे हे इतर तीन क्लार्क जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस लागले आहेत. तर, जालिंदर मोठे हे लिपिक आता सरकारी अधिकारी झाले आहेत.एकूणच या लिपिकांना पिंपरी महापालिकेचा पायगुण लागला असेच म्हणावे लागेल.

Pimpri-Chinchwad
Sanjaykaka Patil : "तुमचे धंदे चालू देणार नाही"; संजयकाकांचा रोहित पाटलांना इशारा

कारण ते येथे रुजू झाले अन काही दिवसांतच त्यांना मोठे पद आणि पगाराची नोकरी चालून आली.स्थापत्य आभियांत्रिकी सहाय्यक श्वेता डोंगरे या पिंपरी महापालिकेतून राज्य सरकारच्या सेवेत गेल्या. त्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाल्या आहेत.या सर्वांना शुभेच्छा देत त्यांना महापालिका प्रशासनाने मोठ्या आनंदाने आपल्या सेवेतून मुक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com