Maharashtra Politics: भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात गुरूवारी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, शनिवारी हा गुन्हा मागे घेण्यात आला.
फिर्यादी माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी गैरसमजातून ही तक्रार केल्याचं प्रतिज्ञापत्र पोलिस ठाण्यात दाखल केलं. यानंतर संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) नेते रोहित पाटील यांना थेट इशारा दिला आहे.
अय्याज मुल्ला यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी शनिवारी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यासमोर रोहित पाटील ( Rohit Patil ) आणि आमदार सुमन पाटील यांनी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, अय्याज मुल्ला यांनी गुन्हा मागे घेताच संजयकाका पाटलांनी रोहित पाटलांवर तोफ डागली आहे.
संजयकाका पाटील ( Sanjaykaka Patil ) म्हणाले, "अय्याज मुल्ला यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माझा कुठलाही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. रोहित पाटील आणि त्यांचे सहकारी नौटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा नौटंकी करण्याचा प्रकार तोंडावर पडला आहे. माझ्यावर केलेल्या टीकेला दोन दिवसांत उत्तर देणार आहे."
"तासगाव आणि कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील जनतेनं यांची नौटंकी करण्याची भूमिका ओखळली आहे. असले धंदे येथून पुढे चालून देणार नाही," अशी वॉर्निंग संजयकाका पाटलांनी रोहित पाटलांना दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.