Police Action Bank Officer: बँकेच्या कर्जप्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी मागितली लाच; वसुली अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

Anti-Corruption Division News : सहकारी बॅंकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणात जामिनदाराविरुद्ध दाखल असलेली तक्रार मागे घेण्यासाठी वसुली अधिकाऱ्याने सव्वा तीन लाख रुपयांची लाच मागितली होती.
Police action
Police action Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सहकारी बॅंकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणात जामिनदाराविरुद्ध दाखल असलेली तक्रार मागे घेण्यासाठी वसुली अधिकाऱ्याने सव्वा तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. हा धक्कादायक प्रकार शिक्रापूर येथील एका सहकारी बॅंकेत घडला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने शिरूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

राजाराम मारुती डेरे (रा. शिक्रापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या वसुली अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांच्या मित्राने २०१३ मध्ये शरद सहकारी बॅंकेच्या (Co-opertaive Bank) शिक्रापूर शाखेकडून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. (Police Action Bank Officer news)

या प्रकरणात तक्रारदार जामीनदार राहिले होते. कर्जाची रक्कम थकल्याने अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, पुणे यांनी वसुली अधिकारी डेरे यांची नियुक्ती केली. कर्जदार रक्कम भरण्यास अपात्र झाल्याने कर्जदार आणि जामीनदाराविरुद्ध तक्रार, तसेच दावा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार जामिनदाराने नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून उर्वरित कर्जाची सर्व रक्कम जामीनदार या नात्याने कर्ज खात्यात भरली, तसेच कर्ज बाकी नसल्याचा बॅंकेकडून दाखला घेतला.

त्यानंतर तक्रारदार यांनी बॅंकेच्या संचालक मंडळास कर्ज वसुलीच्या दरम्यान दाखल केलेल्या तक्रारी, तसेच दावे मागे घेण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यास शरद सहकारी बॅंक, शाखा शिक्रापूर यांनी मान्यताही दिली होती, त्याबाबतचा आदेश बॅंकेने अधिकारी डेरे यांना दिला होता.

Police action
Raosaheb Danve News : आता आम्हाला नागरिकांमध्ये जायची संधी भेटली; दानवेंनी स्पष्टच सांगितले

त्यानुसार, तक्रारदार वसुली अधिकारी डेरे यांच्याकडे तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, डेरे यांनी तक्रारदाराविरुद्ध तक्रार मागे घेण्यासाठी सव्वा तीन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Division) कार्यालयात तक्रार दिली.

तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली. तेव्हा डेरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक्षक अमोल तांबे (Amol Tambe), अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Police action
Video Police Recruitment : पोलीस भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू,राज्यात 17 हजार 471 जागांसाठी 17 लाखांहून अधिक अर्ज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com