Pune Bribe News : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पीएसआय संजय नरळे यांच्याकरिता एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील 25 हजार घेताना तुषार शितल बनकर (वय 30, रा. आंबेगाव पठार) या खासगी व्यक्तीला पुणे एसीबीने काही दिवसांपूर्वी पकडले होते. त्यानंतर सोमवारी (ता. 4) एकाच दिवशीच दोन ट्रॅप लावत दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.
पहिल्या कारवाईत `महावितरण`चा उरुळी कांचन उपविभागाचा उपकार्यकारी अभियंता धम्मपाल हौसाजी पंडीत (वय 50) याला आपल्याच ठेकेदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. या ठेकेदारांना एका जागेवरील विजेचा खांब दुसरीकडे शिफ्ट करायचा होता. तो हलविण्याच्या कामाला मंजुरी देण्य़ाची फाईल पंडीत याच्याकडे दिली होती.
ती मंजूर करण्याकरिता त्याने दोन हजार रुपये लाच मागून ती स्वतःच्या कार्यालयात घेतली. त्याबाबत उरुळी कांचन पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पीआय रुपेश जाधव या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लाचखोरीच्या दुसऱ्या घटनेत दोन हजार रुपयांचीच लाच राजगुरुनगरचा (ता. खेड) तलाठी बबन कारभारी लंघे (वय 46) याने स्वतःच्या कार्यालयात घेण्याचे धाडस केले. त्याबाबत खेड पोलिस ठाण्यात एसीबीने गुन्हा नोंद केला आहे.
लंघेने प्रथम 15 हजार रुपये लाच एका तरुणाकडे मागितली होती. त्यानंतर त्यांच्यात दोन हजार रुपयांवर तडजोड झाली होती. या तरुणाचे व त्याच्या मित्राच्या पत्नीने मिळून एक गुंठा जमीन खरेदी केली होती. तिची नोंद करून सातबारा उतारा देण्यसाठी लंघेने ही लाच मागितली होती. एसीबीच्या पीआय प्रणेता सांगोलकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.