PMC: पुणे महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांना डेंगी सदृश्य लक्षणे

Dengue cases increase in Pune amid rain spells: डॉ. राजेंद्र भोसले यांचे निवासस्थान मॉडेल कॉलनीत आहे. या बंगल्याचा परिसर मोठा आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने आयुक्त बंगल्याची पाहणी केली आहे.
rajendra bhosale
rajendra bhosaleSarkarnama
Published on
Updated on

पुण्यात दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यूचा उद्रेक मोठया प्रमाणात होतो. यंदाही डेंगीच्या रूग्णाची संख्या वाढतच आहे. पुणे महापालिकेचे (PMC) आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना डेंगी सदृश्य लक्षणे आढळल्याची माहिती समोर आली आहे. भोसले यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भोसले यांच्या प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

पुण्यात डासाची उत्पतीच्या ठिकाणाचा शोध घेवून महापालिका प्रशासन औषध फवारणी करीत आहे. डॉ. राजेंद्र भोसले यांचे निवासस्थान मॉडेल कॉलनीत आहे. या बंगल्याचा परिसर मोठा आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने आयुक्त बंगल्याची पाहणी केली आहे. तेथे औषध फवारणी करण्यात आली आहे. डेंगीच्या आळ्या आढळणाऱ्या सोसायट्या आणि विविध आस्थापनांना महापालिका प्रशासन दंड करीत आहे.

पुण्यात झिका पाठोपाठ डेंगीचा कहर दिसून येत आहे. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून स्वच्छता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय.

rajendra bhosale
Vilas Lande: भाचा अजित गव्हाणेसोबत मामा विलास लांडे यांची का झाली नाही शरद पवार राष्ट्रवादीत घरवापसी

पुण्यात झिका रुग्णांची संख्या 28 च्या वर पोहोचली (Pune News) आहे. तर राज्यात 32 रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये झिकाचं सावट आहे. महिला, पुरुष आणि तरुणांचा रुग्णांमध्ये समावेश आहे. मात्र , लहान मुलांना धोका नसल्याचं सांगितलं जात आहे. गर्भवती स्त्रियांना धोका कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com