Pune News : पुणे शहराला अखेर आरोग्य प्रमुख मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख म्हणून डॉ. नीना बोर्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महापालिकेत (Pune Municipal Corporation) रिक्त असलेल्या जागांवर दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.
आरोग्य प्रमुख हे पद महत्त्वाचे मानले जाते. महापालिकेच्या (PMC) कारभारामध्ये पालिका आयुक्तांच्या नंतर आरोग्य प्रमुख हे पद महत्त्वाचे असते. गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता होती. पालिकेच्या आरोग्य अधिकारी नियुक्ती देण्यात आलेल्या डॉ. नीना बोर्हाडे (Dr.Nina Borade) या नांदेडच्या जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. राज्य सरकारने गुरुवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.
महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. भगवान पवार (Dr Bhagawan Pawar) यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात आलेल्या एक तक्रारीवरून राज्य सरकारने (State Government) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. डॉ. पवार यांच्या निलंबनानंतर महापालिकेच्या सेवेतील उपआरोग्य प्रमुख जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे आरोग्य प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. गेल्या दीड महिन्यापासून त्या ही जबाबदारी सांभाळत होत्या.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने पुणे महापालिकेत उपायुक्त दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी प्रशांत ठोंबरे यांचा आणि गोंदिया (Gondia) नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी सुनिल बल्लाळ यांचा समावेश आहे. हे दोन्ही अधिकारी पालिकेत दाखल झाले असून आरोग्य प्रमुख नियुक्ती झालेल्या डॉ. नीना बोर्हाडे शुक्रवारी आपले पद स्वीकारणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.