NCP Vs BJP : '...याला जबाबदार 'शिल्पकार' म्हणवून घेणारे फडणवीस व त्यांना मुकाट्याने साथ देणारे मोहोळ!'

Pune Flood News नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीपात्राची रुंदी कमी करून नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यात आला. यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे.
Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
Devendra Fadnavis, Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सिंहगड रोड ते पुलाची वाडी संपूर्ण परिसर बुधवारी (ता.25) रात्रीच्या पावसामुळे पाण्याखाली गेला. अनेक सोसायट्यांची पार्किंग, नागरिकांच्या गाड्या पाण्याखाली गेल्याच परंतु इमारतींच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरातही पाणी शिरले.

हजारो नागरिकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीला पुणे महानगरपालिका, पाटबंधारे विभाग, पुणे जिल्हाधिकारी व भारतीय जनता पार्टीने पुणे शहराची लावलेली विल्हेवाट जबाबदार आहे.

नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीपात्राची रुंदी कमी करून नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यात आला. यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे. आज झालेल्या प्रलायाची संपूर्ण जबाबदारी स्वतःला पुणे शहराचे शिल्पकार म्हणवून घेणारे देवेंद्र फडणवीस व त्यांना मुकाट्याने साथ देणारे मुरलीधर मोहोळ यांची आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला.

संपूर्ण रात्र मुसळधार पाऊस सुरू असताना, प्रचंड प्रमाणात धरणातून विसर्ग केला जात असताना पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे व महानगरपालिका आयुक्त . राजेंद्र भोसले काय करत होते असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला.

Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
Nilesh Lanke : लंकेंनी 'LCB'च्या हप्त्यांचं रेटकार्ड केलं जाहीर; भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्यानं 'LCB' पुरती घायाळ

पाण्याची पातळी वाढत असताना सायरन वाजवून, भोंग्याद्वारे सूचना देऊन नागरिकांना सतर्क करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी होती, असे असतानाही महानगरपालिका आयुक्त सकाळी 7 वाजेपर्यंत निष्क्रीय होते, म्हणून त्यांची राज्य शासनाने तातडीने बदली करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे याचं उत्तर पुणेकरांना द्यावं अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

पुराने बाधित भागात त्वरित पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
MNS On Vidhan Sabha Election News : विधानसभेसाठी 'मनसे' नेमकं कुणाला तिकीट देणार? ; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

पुणे शहरात पावसाळापूर्वी कोणकोणती कामे पूर्ण करण्यात आली, कोणती कामे शिल्लक राहिली ? का शिल्लक राहिली ? सर्व कामे पूर्ण झाली असा जर महानगरपालिकेचा दावा असेल तर पूर परिस्थिती का निर्माण झाली ? या प्रश्नांची उत्तर पुणे महानगरपालिका आयुक्तांनी द्यावीत अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली

यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता संबंधित खात्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश व्हावेत तथा ज्यांचे नुकसान झाले आहे त्या नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com