Pune Flood Update : ‘मुसळधारे’ने पुण्यात दाणादाण; अजितदादा लागले कामाला, सिंहगड रोड भागात लष्कराची मदत...

Heavy Rainfall News : पुण्यात पावसामुळे सर्वत्र अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिका प्रशासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेत आवश्यक त्या महत्वाच्या सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दुपारी प्रशासनाला दिल्या.
Pune Flood-Ajit Pawar- Army
Pune Flood-Ajit Pawar- ArmySarkarnama
Published on
Updated on

Pune, 25 July : पुण्यात गेल्या 24 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहकार माजविला आहे. शहरातील अनेक रहिवासी भागात पावसाचे पाणी घुसले असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणातून पाणी सोडले जात आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढत असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे.

पुणे शहराला (Pune) पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या 32 वर्षांतील सर्वाधिक पावसाची (Rain) नोंद झाली असून पुढील काही तासांत पावसाचा जोर असाच कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सिंहगड रोड (Sinhagad Road ) परिसरातील अनेक घरांमध्ये तसेच नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.

महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, यासह जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी, अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सिंहगड रोड भागात आर्मी तैनात करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ‘एनडीआरएफ’चे 40 लोकं तैनात आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

Pune Flood-Ajit Pawar- Army
Pune Rain Update : पुणेकरांनो सतर्क रहा! पुराचा धोका आणखी वाढणार; लष्कर दाखल

पुण्यात पावसामुळे सर्वत्र अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिका प्रशासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेत आवश्यक त्या महत्वाच्या सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दुपारी प्रशासनाला दिल्या.

पुण्यात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे बुधवारी मध्यरात्री नंतर अनेक भागात पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. सिंहगड रोड, वारजे, डेक्कन जिमखाना, मंगळवार पेठ यासह पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अनेक भागांत पावसाचे पाणी शिरले आहे.

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुंबईवरून तातडीने पुण्यात येऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह पोलिस आयुक्त अमितेश कुमार, दोन्ही महापालिकांचे आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख आणि अधिकारी सर्व परिस्थितीवरून बारीक नियंत्रण ठेवत आहेत. त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्यातच धरणातून पाणी सोडले जात असल्याने अनेक भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे सगळ्या धरणाचे जिथे कॅनाल आहेत, ते सोडायला सांगितले असल्याचे अजितदादांनी सांगितले. पुण्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष ठेवून असून तेही प्रशासनाला आवश्यक त्या सूचना करत आहेत. नैसर्गिक संकट आलं की विरोधक काय आरोप करतात त्यावर लक्ष द्यायचं नाही. कोणी काही बोलले असेल तरी सुद्धा मला काही बोलायचं नाही, यात मला राजकारण करायचं नाही, असे पवार म्हणाले.

Pune Flood-Ajit Pawar- Army
Pune Flood Update : पुण्यात तीन हजार कार्यकर्ते ऑनफिल्ड

‘दोन दिवस धबधबे पाहण्यासाठी जाऊ नका’

पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात धबधबे कोसळत आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली आहे. त्याचा फायदा घेत काही लोक धबधबे पाहण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतील. धबधबे पाण्यासाठी जाणाऱ्यांचा उत्साह अधिक असतो. त्यांना विनंती आहे की, सध्या परिस्थिती गंभीर आहे.

हवामान खात्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत राहील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या दोन दिवसांत कोणीही धबधबे पाहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले. राज्याचे शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपर संदर्भातील सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com