Sangli News, 26 July : मुंबई-पुण्यासाह राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे आता कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
वाढत्या पाणी पातळीचा लोकांना धोका निर्माण होऊ नये यासाठी आता प्रशासन अलर्ट झालं आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देत अनेकांचे स्थलांतर करण्याचे काम देखील सुरु आहे. अशातच आता कारागृह प्रशासनाने देखील या पावसाची धास्ती घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
कृष्णा नदीची (Krishna River) वाढती पाण्याची पातळी लक्षात घेता, सांगलीतील जिल्हा कारागृहामधील कैद्यांचं स्थलांतर करण्याचं काम सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली (Sangli) कारागृह प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राजवाडा चौक या ठिकाणी जिल्हा कारागृह असून जवळपास चारशेच्या आसपास कैदी आहेत. त्यापैकी सध्या 80 कैद्यांचे कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 60 पुरुष आणि 20 महिला कैद्यांचा समावेश आहे.
2019, 2021 च्या महापुरामध्ये कारागृहाला देखील फटका बसला होता. त्यावेळी कैद्यांना बाहेर काढताना प्रशासनाची मोठी दमछाक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कारागृह प्रशासनाकडून आत्तापासूनच कैद्यांचे स्थलांतर करण्यात येत असून त्यांना कोल्हापूरच्या (Kolhapur) कळंबा कारागृहात रवाना करण्यात येत असल्याची माहिती सांगली कारागृह प्रशासन निरीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.