Kolhapur Collector Office : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांची गाठोडी, काय भानगड आहे...

Flood threat to Kolhapur Collector Office : कोल्हापूरातील पंचगंगा नदी सध्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. पुराचा धोका वाढल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी कागदपत्रांची गाठोडी बांधून ठेवण्यात आली आहे.
Kolhapur Collector Office
Kolhapur Collector OfficeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातील पंचगंगा नदी सध्या धोक्याची पातळी ओलांडून 45 फुटांपेक्षा अधिक पातळीवरून वाहत आहे. पंचगंगा नदी 44 फुटांवर असताना हळूहळू नागरी वस्तीत पाणी येण्यास सुरवात होते. सर्वसामान्यांबरोबरच प्रशासनाने देखील पुराची धास्ती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने कार्यालयातील कागदपत्रांची गाठोडी बांधून ठेवली असून, याची एकच चर्चा कोल्हापूरात रंगलीय.

पंचगंगा नदीने पुराच्या धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराच्या पाण्यात 46 ते 47 फुटापर्यंत वाढ झाल्यास कोल्हापूरमधील (Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी घुसण्यास सुरवात होते. 2019 च्या महापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पुराचे पाणी आल्याने सरकारी कागदपत्रांची प्रचंड हानी झाली होती. याचीच धास्ती घेत जिल्हा प्रशासनानं जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी कागदपत्र स्थलांतरित करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी सर्व सरकारी कागदपत्राची गाठोडी बांधून ठेवली असून आज दिवसभर सर्व कागदपत्रे वरच्या मजल्यावर स्थलांतरित केली जाणार आहेत.

Kolhapur Collector Office
Prakash Ambedkar : संभाजीराजेंच्या वैचारिकतेशी आमचं जुळत नाही; आंबेडकरांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फसला

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी कार्यालयात पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयातील सरकारी कागदपत्रे बांधून तयार ठेवा, अशा सूचना निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. पंचगंगा नदीच्या पाणी पातळी वाढत असून कार्यालयातील कागदपत्रे कर्मचाऱ्यांनी बांधून ठेवली आहेत.

Kolhapur Collector Office
विशाल पाटलांनी पहिल्या भाषणात मूळ मुद्द्यालाच हात घातला, तोही इंग्रजीतून; नेमके काय म्हणाले?

सर्व कागदपत्रे गट्टे बांधून तयार ठेवा, पुराच्या पाण्यामुळे कागदपत्रे भिजून खराब होणार नाही याची योग्य दक्षता घ्या. कागदपत्रे, दस्त, अभिलेख सर्व स्थलांतरित करा. त्याही परिस्थितीत सर्व कागदपत्रे भिजणार नाही याची खबरदारी घ्या. सर्व कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवा. शिवाय कार्यालयातील विद्युत उपकरणे देखील सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा, अशा सूचना निवासी जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com