Solapur : लम्पीमुळे सापडले प्रशासनात हरवलेले ७ ‘डॉक्‍टर’!

प्रतिनियुक्‍तीच्या माध्यमातून उपायुक्त पदापर्यंत पोहोचलेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा पुन्हा पशुसंवर्धन विभागाकडे घेण्यात आल्या आहेत.
administration
administrationSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : कोरोना (corona) महामारीच्या संकटानंतर आता महाराष्ट्र जनावरांमधील लम्पी (Lumpy) या चर्मरोगाचा मुकाबला करत आहे. राज्यावर आलेल्या लम्पीच्या संकटामुळे महापालिकेसह इतर ठिकाणच्या प्रशासनात हरवलेल्या पशुसंवर्धन विभागातील सात डॉक्‍टरांचा शोध लागला आहे. पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी पदावर असलेल्या परंतु प्रतिनियुक्‍तीच्या माध्यमातून उपायुक्त पदापर्यंत पोहोचलेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा पुन्हा पशुसंवर्धन विभागाकडे घेण्यात आल्या आहेत. (Seven 'doctors' lost in administration found due to Lumpy)

महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. लम्पीला आटोक्‍यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला तांत्रिक मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी आऊट सोर्सिंगद्वारे भरती करणे व प्रतिनियुक्ती रद्द करणे, असे दोन पर्याय अवलंबण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागातील सात अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्‍त्या रद्द करून त्यांना पुन्हा पशुसंवर्धन विभागात घेण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. लम्पीच्या माध्यमातून प्रशासकीय वॉर समोर आल्याचेही बोलले जात आहे.

administration
मिलिंद नार्वेकरांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

नवी मुंबई महापालिकेत उपायुक्त पदावर असलेले डॉ. श्रीराम पवार हे पशुसंवर्धन विभागात सहाय्यक आयुक्त आहेत. वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त डॉ. किशोर गवस, नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, नांदेड महापालिकेचे उपायुक्त डॉ. पंजाब खनसोळे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे उपसमाज विकास अधिकारी डॉ. वैभव पवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण हे पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी आहेत.

administration
खेड काँग्रेसचा शेवटचा बुरूजही ढासळला; आक्रमक अमोल पवारांचा शिवसेनेत प्रवेश

पशुसंवर्धन विभागातील या सात अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांची सेवा पुन्हा पशुसंवर्धन विभागाकडे घेतली आहे. पशुसंवर्धन विभागाला तांत्रिक मनुष्यबळाची आवश्‍यकता असल्याने या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्‍त्या रद्द करून त्यांना मूळ विभागात हजर होण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने २९ सप्टेंबर रोजी काढले आहेत.

प्रतिनियुक्तीसाठी नियमावली आवश्‍यक

राज्याच्या प्रशासनात अनेक अधिकारी वशिल्याच्या जोरावर त्यांचा संबंध नसलेल्या विभागात अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी आवश्‍यक असलेली पात्रता व नियमावली, प्रतिनियुक्ती देण्याचा अधिकार यासंदर्भातील राज्याच्या प्रशासनातील सोक्षमोक्ष एकदा लागण्याची आवश्‍यकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com