Success Story: 25 वर्षांपूर्वी कचऱ्याच्या पेटीत सापडली होती... अमरावतीच्या शंकरबाबांची लेक झाली कलेक्टर ऑफिसमध्ये अधिकारी

Mala Papadkar Success Story: जळगाव रेल्वे स्थानकावर २५ वर्षांपूर्वी एका कचरापेटीत ती पोलिसांनी सापडली होती. जन्मापासूनच दृष्टीहीन असल्याने आई-वडिलांनी तिला सोडून दिले.
Mala Papadkar Success Story
Mala Papadkar Success StorySarkarnama
Published on
Updated on

Amravati News: जन्मजात दिव्यांग असलेली, कचरापेटीत सापडलेली, आणि अमरावतीमधील शंकराबाबा पापडकर यांच्या दिव्यांग, आश्रमात वाढलेली माला पापडकरची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सहायकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मालाने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेली क्लार्क-टाइपिस्ट परीक्षा उत्तीर्ण केली होती. सर्वत्र विपरित परिस्थिती असतानाही दृढ इच्छाशक्तीच्या भरोशावर मालाने घेतलेल्या भरारीने ती सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.

मालाच्या आयुष्याचा खडतर प्रवास बघता दुसरी कुठली मुलगी असती तर तिने परिस्थितीसमोर नांगी टाकली असती. २५ वर्षांपूर्वी जळगाव रेल्वेस्थानकावर एका कचरापेटीत ती पोलिसांनी सापडली होती. जन्मापासूनच दृष्टीहीन असल्याने आई-वडिलांनी तिला सोडून दिले.

पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. जळगावला दिव्यांगांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समितीच्या आदेशानुसार पोलिसांनी तिला अमरावती जिल्ह्यातील वझर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकर बाबा पापळकर यांच्याकडे देण्यात आले. शंकर बाबा पापळकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचे माला असं नाव ठेवले. माला शंकरराव पापळकर या नावाने तिचं आधार कार्ड, निवडणूक कार्ड, रहिवासी दाखला आदी कागदपत्र तयार करुन तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली.

Mala Papadkar Success Story
Pahalgam Terror Attack: कोण आहे पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह खालिद? आलिशान गाड्यांच्या शौकीन, लष्करी अधिकारी करतात फुलांचा वर्षाव

मालाला लहानपणीपासूनच शिकायची, पुस्तक वाचायची आवड निर्माण झाली होती. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर ती शिकत गेली. अमरावती येथील डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथून दहावी आणि बारावी उत्तीर्ण केल्यावर अमरावती येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून तिने कला शाखेची पदवी परीक्षा २०१८ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.

मालाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्रा.प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि तिला शिक्षणासाठी संपूर्ण मदत केली. २०१९ मध्ये मला स्पर्धा परीक्षेकडे वळली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड तिची सुरू झाली असताना, अमरावती शहरातील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी तिला मार्गदर्शन केले. येथून तिच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली.

आपणही सर्वसामान्य मुलांप्रमाणे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो, असा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक केली. परिस्थितीने कणखर बनवलेल्या मालाला आता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून दाखवायची आहे. हे चॅलेंज तिने स्वीकारले आहे.

माला म्हणते, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मला फार आनंद होत आहे. मी मात्र एवढ्यावरच थांबणारी नाही. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा मला द्यायची आहे. पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांचे नाव आणखी मोठे करायचे आहे. मला लहानपणीपासूनच नवीन काहीतरी जाणून घ्यायची आवड होती. ब्रेल लिपीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी पुस्तक उपलब्ध नव्हती. यामुळे प्राध्यापक अमोल पाटील यांनी ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातून माझी तयारी करून घेतल्याचे माला पापडकरने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com