Maharashtra teachers news : पदोन्नतीसाठी TET बंधनकारक; बदलीसह पदोन्नती अन् समायोजनासाठी लवकरच नवीन नियमावली

TET mandatory, teacher promotion, Jaykumar Gore : सध्या संबंधित जिल्हा परिषदांमध्ये प्रथम मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे, अशी माहिती जयकुमार गोरे यांनी दिली.
ZP Teachers Transfer Relief News
ZP Teachers Transfer Relief NewsSarkarnama
Published on
Updated on

Zilla Parishad schools : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती तसेच समायोजनाची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. शाळा सुरू होऊन जवळपास महिना उलटला तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यावर्षीची संचमान्यता २० सप्टेंबरपर्यंत न होता फेब्रुवारीमध्ये मिळाल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन वेळेत झाले नाही, असे सरकारकडून सांगितले जात आहे. याअनुषंगाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी विधानसभेत महत्वाची घोषणा केली.

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची पदोन्नती, समायोजन आणि बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवकरच नवीन नियमावली तयार करणार असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर गोरे यांनी ही घोषणा केली.

गोरे यांनी विधानसभेत सांगितले की, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

ZP Teachers Transfer Relief News
BJP news : भाजपवर मोठी नामुष्की; राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातच उमेदवाराने दिला झटका, काही तासांतच अर्ज घेतला मागे

टीईटी संदर्भातील अनेक प्रकरणे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने पदोन्नती आणि त्यानंतरची समायोजन प्रक्रिया विलंबाने होत आहे. यावर्षी संच मान्यता नेहमीप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत न होता फेब्रुवारीमध्ये मिळाल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन वेळेत होऊ शकले नाही, असे गोरे यांनी स्पष्ट केले.

ZP Teachers Transfer Relief News
Congress crisis : काँग्रेसमध्ये 5 वर्षांपूर्वी जे घडलं, आज त्याचीच पुनरावृत्ती; एका नेत्यामुळे होणार पक्षाचा घात?

सध्या संबंधित जिल्हा परिषदांमध्ये प्रथम मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अतिरिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अतिरिक्त शिक्षक समायोजनाचे अधिकार १८ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) आहेत. त्यामुळे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचेही गोरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com