Thane Lok Sabha 2024: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यावर चार हजार पोलिसांची नजर, पॅरामिलिट्री फोर्स,स्ट्रायकिंगच्या ३४ तुकड्या सज्ज

Thane Lok Sabha Election 2024: ४५० जणांवर प्रतिबंधात्मक काव्या करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांचा कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यासह अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे.
Thane Lok Sabha Constituency
Thane Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Thane Politics, 9 may: राज्यातल्या पाचव्या टप्प्यातल्या निवडणूकिसाठी उद्या (सोमवार) मतदान होणार आहे.या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आहे. लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदानात महाराष्ट्राच्या 13 लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ऐरोली व बेलापूर या दोन विधानसभा मतरदारसंघांत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या ४ हजार पोलिसांची नेमणूक केली आहे. यात १९० अधिकारी आहेत. ४०० होमगार्ड व नि पॅरामिलिट्री फोर्सच्या ६ तुकड्याही आहेत. वॉकीटॉकी, मेगाफोनद्वारे हालचालींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी सुमारे ४ हजार पोलिसांसोबत पॅरामिलिट्री फोर्स, होमगार्ड यांच्याही तुकड्या बंदोबस्तावर नेमल्या आहेत. त्यात ५८ पथके ही फिरती आहेत. तर स्ट्रायकिंगच्या ३४ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत.

Thane Lok Sabha Constituency
NDA Vs INDIA: उत्तर प्रदेशात पुन्हा 'NDA'चा शोर की 'INDIA' चा जोर?

स्थानिक पातळीवर होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. यासाठी पोलिसांकडे ६०० २ वॉकीटॉकी, ९२ मेगाफोन देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील मतदारसंघातील २० जणांना तडीपार करण्यात आले आहे. ४५० जणांवर प्रतिबंधात्मक काव्या करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.पोलिसांचा कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यासह अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. त्यामध्ये सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने मतदार निर्भय होऊन मतदान करतील, असाही विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

मतदारांनी निर्भय होऊन मतदान करावे, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात परिमंडळ एकमधील बेलापूर व ऐरोली मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे एका परिमंडळमध्ये संपूर्ण पोलिस आयुक्तालयाची ताकद पुढील दोन दिवसांसाठी लावली आहे. ईव्हीएम मशीनच्या वितरणापासून ते मतदानाच्या रात्रीपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी नवी मुंबईत ईव्हीएम मशीन दाखल झाल्या आहेत. ऐरोली येथील सरस्वती विद्यालय आणि नेरुळ मधील आगरी कोळी भवन मध्ये ईव्हीएम मशीन दाखल झाल्या आहेत. या इव्हिएम मशीन पोलिस बंदोबस्तात प्रत्येक मतदान केंद्रावर पोहचविण्यात येणार असून लोकशाहीच्या उत्सवाची जय्यत तयारी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com