IAS Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेची महिन्यातच पुन्हा बदली; आता 'या' विभागाची जबाबदारी

IAS Transfer News : मुंढेंची १८ वर्षांत २१ वेळा झाल्या बदल्या
Tukaram Munde
Tukaram MundeSarkarnama
Published on
Updated on

Tukaram Munde Transfer : गेल्या महिन्यात आयएसएस तुकाराम मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या १८ वर्षांत त्यांच्या २१ बदल्या झाल्या आहेत.

राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २ जून) वीस भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या केल्या आहेत. यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. त्यांची गेल्या महिन्यातच कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता मुंढे यांच्याकडे मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. (IAS Tukaram Munde)

Tukaram Munde
सरकार कोणतेही असो IAS Tukaram Munde यांच्यावर अन्यायच | Politics | Maharashtra | Sarkarnama

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंडे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुंडे यांना आरोग्य विभागातील महत्वाचे पद देण्यात आले होते. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयांची पाहणी सुरू करीत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काम करताना त्यांनी स्वत:च्या कामाच्या पद्धतीत काहीसा बदल केला. दरम्यान त्यांना अनेक गोष्टी लक्षात आल्यानंतर कोरोना (Corona) काळातील खरेदीची चौकशी करण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांची डिसेंबर २०२२ मध्ये मुंडे यांची उचलबांगडी करण्यात आली.

Tukaram Munde
IAS Transfer Order: मोठी बातमी! राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?

डिसेंबर २०२२ नंतर त्यांना पोस्टिंग देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर मे २०२३ मध्ये दहा ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.

आता या नियुक्तीला महिनाच पूर्ण झाला तोच मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. आता ते या विभागात किती काळ राहतात, याकडेच राज्याचे लक्ष असेल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com