
UP arms factory espionage : पाकिस्तान एजंट नेहा शर्माच्या जाळ्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या शस्त्रनिर्मिती कारखान्यातील विभागप्रमुख रवींद्र कुमार याने देशाची संवेदनशील गोपनीय माहिती देऊन बसल्याचा प्रकार घडला आहे.
दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) रवींद्र कुमार याला अटक केली असून, त्याच्याकडून पाच गोपनीय कागदपत्रे, एक मोबाईल फोन, एटीएम कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दहशतवादीविरोधी पथकाने (ATS) उत्तर प्रदेशातील हजरतपूरच्या शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याविरोधात ही कारवाई केली आहे. रवींद्र कुमार याच्या समाज माध्यमावरील फेसबुकवर शंकास्पद हालचाली वाढल्या होत्या. पाकिस्तानमधील फेसबुक फ्रेंड नेहा शर्मा हिच्याबरोबर संपर्क वाढला होता. त्यातून दहशतवादी विरोधी पथकाला शंका बळावली आणि रवींद्र कुमारच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले.
नेहा शर्मा हिची माहिती घेतल्यावर ती पाकिस्तानची एजंट असल्याचे दहशतवादी विरोधी पथकाच्या लक्षात आले. त्यानंतर रवींद्र कुमार याला ताब्यात घेतले. पैशांचे अमिष दाखवून रवींद्र कुमार याच्याकडून भारताची (India) गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न होता, हे एटीएस पथकाच्या तपासात समोर आले.
रवींद्र कुमार याने देखील चौकशीत गुन्ह्याची माहिती दिली. भारतातील अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती रवींद्र कुमार याने पाकिस्तान एजंटला दिल्याचे एटीएस पथकाच्या चौकशीत समोर आले आहे. रवींद्र कुमार याच्या मोबाईलमध्ये तशी कागदपत्रे आढळली आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 148 आणि कार्यालयीन गुप्तता कायदा 1923नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रवींद्र कुमार 2006पासून ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करतो. सन 2009 पासून तो विभागप्रमुख पदावर आहे. जुलै 2024मध्ये त्याची फेसबुकवर नेहा शर्मा हिच्याशी मैत्री झाली. तो तिच्याशी वारंवार ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण करीत होता, असे एटीएसने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.