police take care son of female candidate
police take care son of female candidate sarkarnama

Police Recruitment News : महिला पोलिस बनली परीक्षार्थीच्या बाळाची ‘आई’

Pimpari Chinchwad police recruitment : पिंपरी-चिंचवड पोलिस दलात सध्या 262 पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा, ही घटना घडली आहे.
Published on

राज्य सरकारतर्फे सध्या पोलिस भरती सुरू आहे. महिला आणि पुरूष गटात होत असलेल्या या भरतीसाठी राज्यातील काना-कोपऱ्यातून उमेदवार दाखल होत आहेत. त्यातच पोलिस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवाराच्या बाळाला चक्क महिला पोलिस कर्मचारी सांभाळत असल्याचं समोर आलं आहे.

पोलिस कर्मचाऱ्यानं बाळाला सांभाळल्यानं भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवाराला आपली परीक्षा देता आली. याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्व स्तरातून महिला पोलिस ( Police ) कर्मचाऱ्याचं कौतुक केलं जात आहे.

पिंपरी-चिंचवड ( Pimpari Chinchwad ) पोलिस दलात सध्या 262 पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भोसरी, इंद्रायणी नगर भागात 19 जून ते 10 जुलै या कालावधीत पोलिस भरती प्रक्रिया पार पडत आहे. पण, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्यानिमित्त भरती प्रक्रिया काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. आता पालखी पुढे गेल्यानं भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

शनिवारी ( 6 जून ) एक महिला उमेदवार आपल्या बाळाला घेऊन मैदानी परीक्षेसाठी आली होती. तिनं आपल्या बाळाला मैदानाच्या बाजूला ठेवलं आणि परीक्षेत उतरली. यावेळी अचानक बाळ रडायला लागलं. बराच वेळ ते बाळ रडत होते. या बाळाकडे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस अंमलदाराचं लक्ष गेलं. तिनं बाळाला आपल्या कुशीत उचलून घेतलं. त्यामुळे हे बाळ शांत झालं.

परीक्षा झाल्यानंतर महिला उमेदवारानं त्या पोलिस महिला अंमलादाराचे आभार मानले. याच घटनेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर महिला पोलिस अंमलदारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com