Police : पोलिस ठाण्यातच अवैध बांधकाम, न्यायालयाकडून गंभीर दखल

Yavatmal Avadhutwadi Police Station Illegal Construction : पोलिस ठाण्यात अवैध बांधकाम प्रकरणाची जनहित याचिका उच्च न्यायालयात 2022 पासून प्रलंबित होती.
Police
Policesarkarnama
Published on
Updated on

Police News : नागरिकांना न्याय देण्याची भाषा करणाऱ्या पोलिस ठाण्यात अवैध प्रकार घडत असेल तर दाद कोणाकडे मागायची? असाच काहीसा प्रकार यवतमाळमधील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात घडला आहे.

या पोलिस ठाण्यातच अवैध बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका करण्यात आली आहे. या याचिकेची गंभीर दखल न्यायालयाकडून घेण्यात आली आहे.

अवैध बांधकाम प्रकरणी तत्कालीन पोलिस अधीक्षक,उप विभागीय अधिकारी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची नावे पोलीस महासंचालकांना ही माहिती तीन आठवड्यात सादर करण्याचे दिले आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस ठाण्यात अवैध बांधकाम प्रकरणाची जनहित याचिका उच्च न्यायालयात 2022 पासून प्रलंबित होती. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. अवधूतवाडी पोलिसांनी Police गुन्हेगारांकडून पैसा गोळा करित त्या पैशातून पोलिस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Police
Shivsena : 'EVM'वरून दोन्ही शिवसेनेचे 'संजय' आमने-सामने; राऊतांचा दावा अन् निरूपमांचा पलटवार

प्रशासनाची मंजुरी नाही

पोलिस ठाण्यातील बांधकामासाठी स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेण्यात आली नसल्याचे आरोप याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकाशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.

तीन आठवड्याची मुदत

या प्रकरणाची न्यायालयाने court गंभीर दखल घेताना गृह विभागाने अतिरिक्त मुख्य सचिवांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणा संदर्भात काय म्हणणे आहे हे तीन आठवड्यात सांगाण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Police
Narayan Rane : 'नारोबांचे फूत्कार, डोक्यावर केसांचा टोप'; ठाकरे गटाने नारायण राणेंना डिवचले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com