Narayan Rane : 'नारोबांचे फूत्कार, डोक्यावर केसांचा टोप'; ठाकरे गटाने नारायण राणेंना डिवचले

Uddhav Thackeray Group Criticized Narayan Rane Through Saamna : राणे हे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौले व डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला, असा टोला ठाकरे गटाने लगावला.
Narayan Rane Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Thackeray Group News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजयी झालेल्या नारायण राणेंनी मी कोकणात शिवसेना संपवली, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याला ठाकरे गटाने 'सामना'तून प्रत्युत्तर दिले आहे. या दाव्याला 'नारोबांचे फुत्कार' असे ठाकरे गटाने म्हटले आहे. तसेच राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारल्याची आठवण देखील ठाकरे गटाने करून दिली आहे.

राणे हे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौले व डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला, पण मोजावेत तसे त्यांचे वर्तन घडले. राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले, या शब्दांत ठाकरे गटाने नारायण राणेंना डिवचले आहे.

राणे Narayan Rane विजयाने हिंस्र व बेफाम होतात. मोदी–फडणवीस–शहांचे तसेच झाले होते. महाराष्ट्राने त्यांचा पराभव केला!‘अब की बार चार सौ पार’वाल्यांचे नाक महाराष्ट्राने कापले, तर त्यांचे दोन्ही कान उत्तर प्रदेशने व ‘मुंडण’ कार्यक्रम राहुल गांधी यांनी केला. तरीही हे लोक विजयाच्या पिपाण्या वाजवत फिरतात हा विनोद आहे, असाटोला ठाकरे गटाने लावला आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने उडवली खिल्ली

मोदी यांनी राणेंना मंत्री केले नाही व खासदार होऊनही बेकारीचे जिणे आल्याने मोदी विरोधाची उबळ बाहेर काढून शिवसेना Shivsena संपविण्याची भाषा करीत आहेत. राणे यांच्याकडे पाहता त्यांची प्रकृती थोडी नाजूक झालेली दिसते. त्यामुळे त्यांना विजयाचे अजीर्ण झाले. असा अजीर्णाचा त्रास राणे यांना यापूर्वी अनेकदा झाला, पण या पोटदुखीवर शिवसेनेनेच जालीम उपाय वेळोवेळी केला, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

पराभवाची करून दिली आठवण

शिवसेनेने राणे व त्यांच्या टोळ्यांच्या कोकणातील दहशतवाद मोडून त्यांचा पराभव केला. राणे यांना शिवसेनेने कोकणातही पाडले व मुंबईतही पराभूत केले. (येथे ‘गाडले’ हा शब्द अधिक उचित आहे.) त्यामुळे शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणची जनता जाणते, असे म्हणत नारायण राणे यांचा शिवसेनेने केलेल्या तीन पराभवांची आठवण ठाकरे गटाकडून करून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com