राष्ट्रवादीचा बार फुसका; संग्राम थोपटेंसह १० जणांची ‘राजगड’वर बिनविरोध निवड!

साखर आयुक्तांपर्यंत भांडून राष्ट्रवादीने नऊ जणांचे अर्ज वैध ठरविले होते, त्यातीलच सहा जणांनी माघार घेतली
Sangram Thopte
Sangram ThopteSarkarnama
Published on
Updated on

भोर : मोठा गाजावाजा करत भोरचे काँग्रेसचे (Congress) आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या विरोधात राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजप (BJP), शिवसेना (shivsena) यांना नामुष्कीला सामोरे जावे लागले. साखर आयुक्तांपर्यंत भांडून राष्ट्रवादीने नऊ जणांचे अर्ज वैध ठरविले होते, त्यातीलच सहा जणांनी माघार घेतली. तसेच, इतर १३ जणांनी म्हणजे १९ जणांनी माघार घेतल्याने आमदार थोपटे गटाच्या १० उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वपक्षीयांचा बार फुसका ठरला आहे. (10 unopposed in Rajgad Sugar factory election)

भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आता तीन गटांमधील ७ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. या ११ उमेदवारांमध्ये सत्ताधारी कॉग्रेसच्या सात जणांचा, राष्ट्रवादीच्या तिघांचा, तर भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. बिनविरोध निवडले गेलेले १० उमेदवार हे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील ११ उमेदवारांची यादी आणि चिन्हांचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी गुरुवारी (ता.१९ मे) वाटप केले.

Sangram Thopte
लोकसभेला व्होट आणि नोट मिळविणाऱ्या सदाभाऊंनी अनुभवला सोलापुरी हिसका!

थोपटे गटाचे बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे ः गट क्रमांक ३ (सारोळा-गुणंद-खंडाळा)- किसन दौलतराव सोनवणे व दत्तात्रेय दिनकर चव्हाण. गट क्रमांक ४ (कापूरव्होळ-वेळू-हवेली)-विकास नथुराम कोंडे, शिवाजी खंडेराव कोंडे. मतदारसंघ ब वर्ग सहकार उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था- आमदार संग्राम थोपटे. अनुसुचित जाती-जमाती- अशोक कोंडीबा शेलार. महिला राखीव प्रतिनिधी- सुरेखा अमोल निगडे व शोभा हरिभाऊ जाधव. इतर मागास प्रवर्ग- संदीप किशोर नगिने. भटक्या विमुक्त जाती जमाती- चंद्रकांत रामचंद्र सागळे.

Sangram Thopte
ओबीसी आरक्षणाची खरी मारेकरी राष्ट्रवादी काँग्रेसच : पडळकरांचा खळबळजनक आरोप

राजगड साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले होते. त्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने साखर आयुक्तांकडे अपील करण्यात आले होते. साखर आयुक्तांनी ११ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते, त्यामुळे कारखान्याची निवडणूक चुरशीची होण्याची चर्चा रंगली होती. मात्र, वैध ठरलेल्या ९ उमेदवारांपैकी सहा जणांनी माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांना मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. आता निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांकडून राष्ट्रवादीचे २ आणि भाजपचा १, तर काँग्रेसच्या सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा निवडणुकीचा बार फुसका निघाल्याची चर्चा रंगली आहे.

Sangram Thopte
आमदार अशोक पवार शिरूर-हवेलीला लवकरच देणार ‘गूड न्यूज’!

निवडणुकीतील उमेदवार ः गट क्रमांक- १ भोर देवपाल (२ जागा), रामचंद्र पर्वती कुडले (राष्ट्रवादी), सुभाष मारुती कोंढाळकर (कॉग्रेस), उत्तम नामदेव थोपटे (कॉग्रेस). गट क्रमांक २ येवली-हातवे बुद्रूक (३ जागा)- सुधीर चिंतामण खोपडे (कॉग्रेस), पंडीत रघुनाथ बाठे(राष्ट्रवादी), विलास अमृतराव बांदल (भाजप), सोमनाथ गणपत वचकल(कॉग्रेस), पोपटराव नारायण सुके(कॉग्रेस). गट क्रमांक ५ रुळे-वरसगाव-पानशेत (२ जागा) - रामदास किसन गायकवाड(राष्ट्रवादी), दिनकर सोनबा धरपाळे(कॉग्रेस), प्रताप धोंडीबा शिळीमकर(कॉग्रेस) यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com