Pune News : पुण्याच्या बुधवार पेठेत पकडल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 बांगलादेशी महिला; पोलिसांची शोध मोहीम एफसी रोड, डेक्कनपर्यंत पोचली

Bangladeshi 13 women Arrested : पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे शहरातील बुधवार पेठेतील एका इमारतीमध्ये छापा टाकण्यात आला होता. यादरम्यान तेरा महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
File Photo
File PhotoSarkarnama
Published on
Updated on

Pune, 22 July : पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट एरियात फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत 13 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिलांनी अनाधिकृतपणे भारतात प्रवेश करून वेश्या व्यवसाय केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे शहरातील बुधवार पेठेतील एका इमारतीमध्ये छापा टाकण्यात आला होता. यादरम्यान तेरा महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही महिला आणि बांगलादेशी पुरुषही या ठिकाणी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पुणे पोलिसांचे नवीन उपायुक्त हृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात परकीय नागरिक आदेश कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान बुधवार पेठेतील बांगलादेशी रॅकेट समोर आला आहे. या रॅकेट अंतर्गत बांगलादेशातून महिलांना अनाधिकृतपणे भारतात आणले जाते. या महिलांना नोकरी किंवा चांगल्या जीवनाचे आमिष दाखवले जाते. पश्चिम बंगालच्या सीमेवरून त्यांचा बनावट कागदपत्रांसह भारतात प्रवेश करवला जातो.

File Photo
Mahesh Kothe News : भाजपचे विजयकुमार देशमुखांविरोधातील न्यायालयीन लढाई आता प्रथमेश कोठे लढणार; महेश कोठेंनी हायकोर्टात दाखल केली होती याचिका

विविध मार्गाने त्यांना पुण्यात आणून बुधवार पेठ यासारख्या रेड लाइट एरियामध्ये वेश्याव्यवसायात ढकलले जाते. स्थानिक दलाल आणि मध्यस्थ यात सामील असतात, जे या व्यवसायाचे संचालन करतात.हे रॅकेट स्थानिक दलाल, मध्यस्थ आणि काहीवेळा गुन्हेगारी टोळ्यांशी जोडलेले असते. यांच्या माध्यमातून या महिलांना ओळख लपवण्यासाठी बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा इतर कागदपत्रे पुरवली जातात.

काही दिवसांपूर्वी बांगलादेशामधून अशाच एका तरुणीला ‘तुला ब्युटी पार्लरमध्ये जॉब देतो’ असं सांगून बुधवार पेठ परिसरामध्ये आणण्यात आलं. त्यानंतर तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडण्यात आलं होतं. मात्र, तिला मारहाणही करण्यात आली, त्याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच, त्या तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर पोलिस या बांगलादेशी सिंडिकेटच्या मागे लागले आहेत.

File Photo
Rajan Patil Politic's : सोलापूर शहराच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हजेरी लावत राजन पाटलांनी साधला राजकीय डाव!

या प्रकरणाची माहिती देताना पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले म्हणाले, आपण बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी एक पथक बनवलेले आहे. त्या पथकाने कारवाई सुरू केली असून त्या अंतर्गत बांगलादेशी महिला पकडल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत 13 महिला आढळल्या आहेत, त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com