भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?

आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्याशीही गुप्त बैठकीद्वारे केली चर्चा
BJP- ncp flags
BJP- ncp flags
Published on
Updated on

पुणे : लोणावळा नगरपरिषदेच्या (Lonavla Municipal Council) नगराध्यक्षा सुरेखा जाधव (Surekha Jadhav) यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेले 18 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप (BJP), शिवसेना (shivsena) आणि काँग्रेस (Congress) व अपक्ष असे 18 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या लोणावळा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. विषेश म्हणजे या नगरसेवकांनी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्याशीही गुप्त बैठकीद्वारे चर्चाही केली. त्यामुळे 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या नाराज नगरसेवकांनी एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव लोणावळा शहराच्या विकास कामात स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. लोणावळा हे पर्यटनस्थळ आहे. या जागी रहिवास भाग तयार करणे व केबल टाकण्याच्या खोदकामाबाबत नगर सेवकांना विश्वासात घेतले नाही. स्वहितासाठी नगराध्यक्षा जाधव हे विषय वारंवार सर्वसाधारण व विशेष सभेला घेतले.

BJP- ncp flags
महाविकास आघाडीला दणक्याची तयारी : सेनेच्या तीन आमदारांवर भाजपचा डोळा

मात्र, 4 जानेवारी रोजी झालेली सर्वसाधारण सभा आणि त्यानंतर 10 जानेवारीला झालेली विशेष सभा नगरसेवकांनी हाणून पाडल्या. तर पंचवार्षिक काळातील शेवटच्या सभेलाही बहिष्कार टाकणार असल्याची माहिती यावेळी नगरसेवकांनी दिली.

भाजप नगरसेविका अपर्णा बुटाला म्हणाल्या की, सुरेखा जाधव आणि पक्षाचे पदाधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत. आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे नगराध्यक्षा जाधव यांच्यावर नाराज असल्याने नगरसेवक नाराज आहेत. तर 'विकासाच्या कामात आम्ही सहकार्य करु पण चूकींच्या कामांना आम्ही साथ देणार नसल्याची खंत काँग्रेसच्या नगरसेविका आरोही तळेगावकर यांनी व्यक्त केली.

तर आमदार सुनील शेळके यांनीही याबाबत आपले म्हणणे मांडत नगरसेवकांना दिलासा दिली आहे. हे 18 नगरसेवकांनी रविवारी (9 जानेवारी) रात्रीच संपर्क केला. त्यांनी लोणावळा शहरात विकास कामात सुरु असलेल्या चुकीच्या कामांची माहिती दिली.तसेच, चुकीच्या कामाला पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com