शिंदे सरकारमध्ये चाललंय काय? पोलिस बदल्यांतही घोळः 19 IPS अधिकाऱ्यांना नियुक्तीच नाही

IPS Officers Transfers : राज्यात सत्ताबदल होताच महाविकास आघाडी सरकारच्या मर्जीतील अधिकारी बदलण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने सुरु केला आहे.
IPS Officers Transfers
IPS Officers Transferssarkarnama
Published on
Updated on

IPS Officers Transfers : राज्यात सत्ताबदल होताच महाविकास आघाडी सरकारच्या मर्जीतील अधिकारी बदलण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने सुरु केला आहे. त्यात प्रथम पिंपरीचे (Pimpri-Chinchwad) पालिका आयुक्त राजेश पाटील व त्यानंतर अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली करण्यात आली.

मात्र, ढाकणे यांना चाळीस दिवसानंतरही अद्याप नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. यामुळे मागील सरकारच्या काळातील अधिकाऱ्यांच्या बाबतीत सध्याचे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याची चर्चा ऐकायला मिळाली आहे.

दरम्यान, नियोजनाअभावी राज्य सरकारची दिवाळीची आनंदी शिधा ही योजना जशी फसली त्याप्रमाणे या वरिष्ठ महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यातील घोळही दिसून आला आहे. महसूल तथा सनदी अधिकाऱ्यानंतर पुणे ग्रामीण एसपींसह राज्यातील ४३ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्याही (IPS) राज्य सरकारने नुकत्याच (ता.२०) बदल्या केल्या.

IPS Officers Transfers
निवडणुकीत पराभवाच्या धास्तीने, पुणे हद्दीतील गावे वगळण्याचा भाजप-शिंदे गटाचा डाव?

मात्र, त्यातील तीन बदल्या या २४ तासांतच स्थगित करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. तर, १९ जणांना बदलीचे ठिकाणच अद्याप देण्यात आलेले नाही. यातून नियोजन न करता घाईने या बदल्या केल्याने त्यात घोळ झाल्याचे समोर आले आहे. तसेच फील्ड पोस्टिंग देण्यापासून मराठा अधिकाऱ्यांना वंचित ठेवण्यात आल्याचे ४३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली आदेशातून दिसून आले आहे.

गेल्या महिन्याच्या १३ तारखेला करण्यात आलेल्या ढाकणे यांच्या मुदतपूर्व बदलीने या बदलीच्या घोळाला आणखी दुजोरा दिला आहे. कारण चाळीस दिवसानंतरही त्यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण अद्याप दाखविण्यात आलेले नाही.

त्यांच्याअअगोदर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरीत आयुक्त म्हणून आणलेले पाटील यांचीही मुदतपूर्व उचलबांगडी १६ ऑगस्टला राज्य सरकारने केली होती. पण, ती अशा ठिकाणी करण्यात आली होती की तिथे ते हजरच झाले नव्हते. त्यामुळे पुन्हा त्यात बदल करून ती पुणे येथे करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पदभार घेतला.

दरम्यान, ४३ डीसीपी तथा एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनंतर आता २३ ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या लवकरच राज्य सरकार करणार आहे. त्यात पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचेही बदली होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वीच्या सरकारने आपल्या सोईने या अधिकाऱ्यांच्या बदल्या १८ सप्टेंबर २०२० रोजी केल्या होत्या.

IPS Officers Transfers
`पदवीधर` निवडणुकीत विखे- थोरातांची पारंपारीक लढत?

त्यांची मुदत पूर्ण झाल्याचे सांगून आता त्यांच्या बदल्या हे सरकार करणार आहेत. मात्र, रश्मी शुक्लांसारख्या आपल्या मर्जीतील बिगरमराठा अधिकाऱ्यांची महत्वाच्या पदी नियुक्ती करायची असल्यामुळे या २२ अधिकाऱ्यांनाही बिगरमहत्वाच्या ठिकाणी (साईड पोस्टिंग) दिली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com