Pradeep Kurulkar Case Update : कुरुलकरांच्या अडचणी वाढणार; 'एटीएस'कडून 'पॉलिग्राफ' टेस्टची मागणी,काय आहे कारण?

Maharashtra ATS : ''...म्हणून देशद्रोही कलमे लावून कुरुलकर आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करा!''
Pradeep Kurulkar Case Update
Pradeep Kurulkar Case UpdateSarkarnama

Maharashtra News: भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याच्या गंभीर आरोपाखाली 'डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुलकर सध्या एटीएसच्या कोठडीत आहे. या 'हनीट्रॅप' प्रकरणात तपासादरम्यान नवनवीन धक्कादायक खुलासे करण्यात येत आहे. तसेच कुरुलकरांनंतर आत्तापर्यंत गुप्तचर विभागासह वायुदलाचा अधिकारी अडकला असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात न्यायालयात एटीएसनं न्यायालयाकडे 'पॉलिग्राफ टेस्ट'ची परवानगी मागितली आहे.

देशाच्या संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरविल्याच्या संशयावरून 'डीआरडीओ'चे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर(Pradeep Kurulkar) यांना एटीएसने 4 मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे त्यांना एटीएसने शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. कुरुलकर यांना 29 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी (दि.16) दिले. यावेळी सुनावणीवेळी महाराष्ट्र एटीएसनं पॉलिग्राफ टेस्ट परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे.

Pradeep Kurulkar Case Update
Pradeep Kurulkar Case: मोठी बातमी! ' डॉ. कुरुलकरांनंतर अन्य एक अधिकारी 'हनीट्रॅप' मध्ये; 'ATS'च्या हाती महत्वाचे धागेदोरे...

एटीएसनं का केली पॉलिग्राफ टेस्ट मागणी?

पाकिस्तानी गुप्तहेराला कुरुलकर यांनी नक्की काय-काय सांगितलं आहे. त्यांच्याशी किती लोक संपर्कात होते.पैशांची देवाणघेवाणही झाली होती का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पॉलिग्राफ टेस्टमधून मिळेल असं एटीएसला वाटतंय.अत्यंत संवेदनशील माहितीची देवाणघेवाण झाल्याचं दर्शवणारा काही डेटा एफएसएलनं जप्त केला आहे. तसेच, काही गोष्टी कुरुलकर यांनी उघड केली नसल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. त्यामुळे अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्हा त्यांची पॉलिग्राफ चाचणी करायची आहे असं महाराष्ट्र एटीएस(Maharashtra ATS) नं न्यायालयाला सांगितलं आहे.

Pradeep Kurulkar Case Update
Amol Kolhe News: पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी; खासदार कोल्हे म्हणाले,'' शिवनेरी नावाला विरोध नाही,पण...

'डीआरडीओ'च्या गेस्ट हाऊसमध्ये...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अनेक अंगानी केला जात आहे. यामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी पडताळून पाहिल्या जात आहेत. यामध्ये कुरुलकर यांना भेटण्यासाठी डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिला आल्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याचाही तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान कुरुलकर अनेक गोष्टींचा खुलासा करत नाहीत. तसेच, काही प्रश्नांची योग्य उत्तरंही देत नाहीत. तपास यंत्रणांना असाही संशय आहे की, त्या पाकिस्तानी महिलेला परदेशात भेटायला गेले होते आणि शारीरिक संबंधांच्या लालसेपोटी कुरुलकरांनी सर्व गोष्टी महिलेला सांगितल्याचंही बोललं जात आहे.

कुरुलकरांच्या कुटुंबियांचीही चौकशी करा; दवेंची मागणी

डीआरडीओ(DRDO)चे संचालक प्रदीप कुरुलकर आणि भारतीय वायुदलात तैनात असलेले निखिल शेंडे या दोघांना फसवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून दोन महिलांचे फोटो वापरण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे. यावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे(Anand Dave) यांनी कुरुलकर यांच्या कुटुंबियांना पण ताब्यात घ्या आणि त्यांची चौकशी करा अशी मागणी केली आहे.

Pradeep Kurulkar Case Update
Pradeep Kurulkar News: 'डीआरडीओ'चे संचालक डॉ.कुरुलकरांचा मुक्काम आता येरवडा कारागृहात

काय म्हणाले दवे?

घरातील कर्त्या पुरुषाकडे नेहमीपेक्षा जास्त पैसा येतो आहे. त्यांचे संपर्क संशयास्पद आहेत. याची त्याच्या घरच्यांना कल्पना असणारच आहे. त्यामुळे घरच्यांची चौकशी व्हावी. शिवाय या प्रकरणी देशद्रोही स्लीपर सेल्सना सुद्धा गुन्ह्यातील सहभागी म्हणून कलमे लावून अटक करावी. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या पूर्ण कुटुंबाची मालमत्ता जप्त करावी अशी आक्रमक मागणी दवे यांनी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com