Pune Crime: निलेश घायवळ गँगचा नंबरकारी आजाच्या घराची झाडाझडती; 400 काडतूस जप्त

Pune Crime News: पुण्यातील गुंड निलेश घायवळ गँग बाबत नवीन माहिती समोर येत आहे. निलेश घायवळ टोळीचा शार्प शुटर अजय सरोदे याच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 400 काडतूस सापडली आहेत.
Pune Crime
Pune CrimeSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News: पुण्यातील गुंड निलेश घायवळ गँग बाबत नवीन माहिती समोर येत आहे. निलेश घायवळ टोळीचा शार्प शुटर अजय सरोदे याच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 400 काडतूस सापडली आहेत.

यातील 200 काडतूस बालेकिल्ल्याला आहेत तर 200 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. कोथरूड पोलिसांनी अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना गाणगापूर, कर्नाटक येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. दोघांची पोलिस कसून चौकशी करीत आहे. यात अजय सरोदे यांच्या घराच्या झाडाझडती घेतली असता पोलिसांनी तेथून ही 400 काडतूस मिळाली आहेत.

अजय सरोदे याच्याकडे पिस्तुल परवाना असल्याचे माहिती आहे. त्याला 29 जानेवारी 2024 ला पोलिसांनी पिस्तुल परवाना दिला होता. कोथरूड भागात 17 सप्टेंबरला रोजी घायवळ टोळीने एकावर गोळीबार केला होता. त्यावेळी अजय सरोदे घटनास्थळी उपस्थित होता. त्यामुळे त्या गुन्ह्यात अजय सरोदे हा ही आरोपी आहे. नंबरकारी आजा या नावानं त्याची घायवळ गँगमध्ये ओळख आहे.

निलेश घायवळवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. निलेश गायवळ लंडनमध्ये फरार आहे. दहशत निर्माण करून बेकायदेशीररीत्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार त्याने केले आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली असल्याचे पोलिस तपातास आढळले आहे. निलेश घायवळ याच्यावर 45 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

Pune Crime
PMO: मोदींचा ऐतिहासिक निर्णय! ७८ वर्षे जुनं कार्यालय आता ओळखलं जाणार ‘सेवा तीर्थ’

खंडणी उकळणं आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडींचा सखोल तपास होऊन गैरव्यवहार उघडकीस यावेत, यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र पाठवलं आहे.

सरोदे याच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. त्याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल असताना शस्त्र परवाना कसा मिळाला, याची चौकशी सुरू आहे. सरोदेने लोणावळ्यात गोळीबाराचा सराव केल्याची कबुली दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com